Cryptocurrency prices | बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या सुरूच

Cryptocurrency prices Today | बिटकॉइनच्या किंमतीत आणखी ३ टक्क्यांची घसरण होत ती ४८,१३० डॉलरवर आली. त्याचप्रमाणे इथर आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील (Cryptocurrency prices) घसरण झाली आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ (Global Cryptocurrency market) क्रॅश होत ५ टक्क्यांनी घसरून २.३३ ट्रिलियन डॉलरवर आली आहे.

Cryptocurrency prices Today
बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या सुरूच 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनच्या किंमतीत घसरण
  • इथरसह सर्व क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत घसरण सुरूच
  • जागतिक वित्तीय बाजारातील नकारात्मक वातावरणाचा फटका

Cryptocurrency prices Today | नवी दिल्ली : आज बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin price)घसरण होत बिटकॉइनची किंमत ४९,००० डॉलरच्या पातळीखाली आली. बिटकॉइनच्या किंमतीत मागील आठवडाभरात चांगलीच घसरण होत तिचे मूल्य एक पंचमांशाने कमी झाले आहे. बिटकॉइनच्या किंमतीत आणखी ३ टक्क्यांची घसरण होत ती ४८,१३० डॉलरवर आली. त्याचप्रमाणे इथर आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील (Cryptocurrency prices) घसरण झाली आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ (Global Cryptocurrency market) क्रॅश होत ५ टक्क्यांनी घसरून २.३३ ट्रिलियन डॉलरवर आली आहे. (Bitcoin & other cryptocurrencies continue to fall)

जागतिक वित्तीय बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातदेखील मोठी अनिश्चितता निर्माण होत क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत चांगलीच घसरण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे जगभरातील शिखर बॅंकांना आपले पतधोरण कडक करावे लागणार आहे. त्यामुळे जागतिक वित्तीय बाजारातील पैशाचा ओघ आटू शकतो. 

जागतिक वित्तीय बाजाराचा विपरित परिणाम

इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्क आधारित असलेल्या इथरच्या किंमतीतदेखील घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ जवळपास ५ टक्क्यांनी घटून २.३३ ट्रिलियन डॉलरवर आली आहे. मागील महिन्यातच क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ ३ ट्रिलियन डॉलरच्या पार झाली होती. त्यावेळेस बिटकॉइनची किंमत विक्रमी ६९,००० डॉलरच्या पातळीवर पोचली होती. मात्र या आठवड्यात जगभरातीलच वित्तीय बाजार गडगडला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारात आणि अमेरिकेच्या बॉंड्सच्या परताव्यात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील रोजगारातील घट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा जगभरातील फैलाव यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराबरोबर शेअर बाजारातील गुंतवणुकदारदेखील सावध झाले आहेत.

भारतातदेखील महागाईचा दणका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात तेजी आली आहे. सध्या कच्च्या तेलाच्या भावात २.७० टक्के तेजी दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ७१.७७ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आज सेन्सेक्स ९४९ अंशांच्या घसरणीसह ५६,७४७ अंशांच्या पातळीवर बंद झाला. डॉलर इंडेक्स सध्या ९६.१७७ च्या पातळीवर आहे. मागील सात आठवड्यापासून सातत्याने डॉलर इंडेक्समध्ये तेजी दिसून येते आहे.

जर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले तर त्यामुळे महागाईमध्ये वाढ होते. जर महागाई वाढली तर सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आणखी अवघड होऊन बसते. सर्व वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ होते. त्यामुळे लोकांची खरेदी क्षमता कमी होते. याशिवाय रुपया कमजोर झाल्याने आयातीचा खर्च वाढतो. आयात खर्च वाढल्यामुळे देशाच्या खजिन्यात घट होते.

मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि डिजिटल करन्सी (Digital Currency) हा जगभरच चर्चेचा विषय झाला आहे. अनेक देश यावर काम करत आहेत. भारताच्या क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)दीर्घ काळापासून काम करते आहे. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बॅंका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि इंग्लंडच्या सेंट्रल बॅंका क्रिप्टोकरन्सीच्या विविध शक्यतांवर काम करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी