Cryptocurrency Prices | बिटकॉइन गडगडला, इथरसह इतरही क्रिप्टोकरन्सी झाली क्रॅश

Cryptocurrency Prices | बिटकॉइनची किंमत १२ टक्क्यांनी घसरली आहे. बिटकॉइन ४७,४९५ डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत होता. ट्रेडिंग सेशनमध्ये एका क्षणी तर बिटकॉइन ४१,९६७ डॉलरच्या पातळीपर्यत देखील खाली गेला होता. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातील (Cryptocurrency Market) या विक्रीच्या धडाक्यामुळे इथर आणि क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील जबरदस्त घसरण झाली. इथरच्या (Ether) किंमतीत १० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

Crash in Bitcoin price
बिटकॉइनसह क्रिप्टोकरन्सी गडगडल्या 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनची किंमत ४७,४९५ डॉलरच्या पातळीवर, झाली १२ टक्क्यांची घसरण
  • इथरसह इतरही क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत मोठी घसरण
  • जागतिक अर्थव्यवस्था, ओमिक्रॉनसारख्या चिंतांमुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये जगभर विक्रीचा माहोल

Bitcoin Prices Today | नवी दिल्ली :  बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin Price) मोठी घसरण होत बिटकॉइनने आपले जवळपास एकपंचमांश मूल्य गमावले आहे. नफावसूली आणि जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातील चिंता यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) बाजारात अब्जावधी डॉलर्सच्या बिटकॉइनची (Bitcoin)आणि इतर क्रिप्टोकरन्सीची विक्री झाली आहे. बिटकॉइनची किंमत १२ टक्क्यांनी घसरली आहे. बिटकॉइन ४७,४९५ डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत होता. ट्रेडिंग सेशनमध्ये एका क्षणी तर बिटकॉइन ४१,९६७ डॉलरच्या पातळीपर्यत देखील खाली गेला होता. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातील (Cryptocurrency Market) या विक्रीच्या धडाक्यामुळे इथर आणि क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील जबरदस्त घसरण झाली. इथरच्या (Ether) किंमतीत १० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याआधी बिटकॉइनची किंमत यावर्षी विक्रमी ६९,००० डॉलरच्या पातळीवर पोचली होती. यावर्षी आतापर्यत बिटकॉइनच्या किंमतीत ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसून आली होती.  (Bitcoin & Other cryptocurrencies show huge crash after global concerns)

जागतिक घटकांचा विपरित परिणाम

इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्क आधारित असलेल्या इथरच्या किंमतीतदेखील १० टकक्यांची घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ जवळपास १५ टक्क्यांनी घटून २.३४ ट्रिलियन डॉलरवर आली आहे. मागील महिन्यातच क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ ३ ट्रिलियन डॉलरच्या पार झाली होती. त्यावेळेस बिटकॉइनची किंमत विक्रमी ६९,००० डॉलरच्या पातळीवर पोचली होती. मात्र या आठवड्यात जगभरातीलच वित्तीय बाजार गडगडला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारात आणि अमेरिकेच्या बॉंड्सच्या परताव्यात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील रोजगारातील घट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा जगभरातील फैलाव यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराबरोबर शेअर बाजारातील गुंतवणुकदारदेखील सावध झाले आहेत.

जगभरातील क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ मागील २४ तासात ६.३६ टक्के घसरणीसह २.४४ ट्रिलियन डॉलरवर पोचली आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत क्रिप्टोकरन्सीचा एकूण बाजार १३७.५० अब्ज डॉलरचा होता. बिटकॉइनच्या किंमतीतदेखील घसरण झाली आहे. बिटकॉइनचा हिस्सा क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत ४१.०४ टक्के इतका होता. दुसऱ्या बाजूला गिफ्टोच्या किंमतीत मात्र ५४ टक्के वाढ होती ती ६.६२ रुपयांवर पोचली आहे.

मुकेश अंबानींनी केले ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे समर्थन

रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांनी म्हटले आहे की त्यांचा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर विश्वास आहे. अर्थात ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोकरन्सी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असेही अंबानी पुढे म्हणाले. सध्या केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी एका विधेयकावर काम सुरू आहे. यामध्ये आरबीआयच्या कामाचादेखील समावेश आहे. सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी आणि त्याच्या बाजारपेठेवर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारच्या क्षेत्राचे नियमन कसे करायचे याची चर्चा सुरू आहे.

मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि डिजिटल करन्सी (Digital Currency) हा जगभरच चर्चेचा विषय झाला आहे. अनेक देश यावर काम करत आहेत. भारताच्या क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)दीर्घ काळापासून काम करते आहे. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बॅंका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि इंग्लंडच्या सेंट्रल बॅंका क्रिप्टोकरन्सीच्या विविध शक्यतांवर काम करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी