Cryptocurrency Prices | बिटकॉइनच्या किंमतीत घसरण मात्र इथरियममध्ये तेजी

Cryptocurrency Market : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणारे  बिटकॉइनच्या (Bitcoin) किंमतीतील घसरण सुरूच आहे. सध्या बिटकॉइन 37,614.26 डॉलरच्या पातळीवर आले आहे. बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin price)यावर्षी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.  नोव्हेंबरमध्ये 69,000 डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावरून बिटकॉइन आतापर्यत 50% पर्यंत खाली आले आहे.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोककरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनच्या किंमतीत मोठी घसरण
  • इथेरियमच्या किंमतीत तेजी
  • कार्डेनो आणि अॅव्हलान्जच्या किंमतीत उसळी

Bitcoin Price update : नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणारे  बिटकॉइनच्या (Bitcoin) किंमतीतील घसरण सुरूच आहे. सध्या बिटकॉइन 37,614.26 डॉलरच्या पातळीवर आले आहे. बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin price)यावर्षी मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.  नोव्हेंबरमध्ये 69,000 डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावरून बिटकॉइन आतापर्यत 50% पर्यंत खाली आले आहे. तर क्रिप्टोकरन्सीचे जगातील एकूण बाजारमूल्य (Cryptocurrency Market Cap) 24 तासात 3.07 टक्क्यांनी वाढून $1.70 ट्रिलियनवर पोहोचले आहे. त्याच कालावधीत व्यापाराचे प्रमाण 7.83 टक्क्यांनी घसरून $81.35 अब्ज झाले. (Bitcoin plunged to $37,614.26 while Ethereum rise by 3.64%)

बिटकॉइनच्या गटांगळ्या

त्याच वेळी, stablecoins $ 81.34 अब्ज वर 99.99 टक्के वाढले आहेत. बिटकॉइनची बाजारातील उपस्थिती 0.31 टक्क्यांनी घसरून 41.80 टक्क्यांवर आली आहे. बाजार भांडवलानुसार जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेले बिटकॉइन आज 37,614.26 डॉलरवर व्यवहार करते आहे. रुपयामध्ये बिटकॉइनचे मूल्य सांगायचे झाल्यासत, बिटकॉइन 0.6 टक्क्यांनी वाढून 29,97,340 रुपयांवर पोहोचले. तर, इथरियमची किंमत ३.६४ टक्क्यांनी वाढून २,०२,९९४ रुपये झाली आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या (Ukraine conflict) भीतीने जगभरातील जोखमीच्या गुंतवणूक प्रकारातील विक्री वाढल्याचाही फटका बिटकॉइनला आधीच बसला आहे.

Cardano, Avalanche मध्ये उसळी

त्याच वेळी, Cardano 0.43 टक्क्यांनी वाढून 83.86 रुपयांवर पोहोचला आहे.  Avalanche 2.52 टक्क्यांनी उसळून 5,352.35 रुपयांवर आला आहे. तर, पोल्काडॉट 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 1,453.1 रुपयांवर आहे. दुसरीकडे, Litecoin गेल्या 24 तासांत 1.23 टक्क्यांच्या वाढीसह 8,776.11 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर, टिथरच्या किमती 0.79 टक्क्यांनी घसरून 80.07 रुपयांवर आल्या आहेत.

Mimcoin SHIB बद्दल बोलायचे तर, यात 1.31 टक्के वाढ झाली आहे. तर, Dogecoin 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 11.33 रुपयांवर व्यवहार करत आहे. टेरा (LUNA) देखील 6.95 टक्क्यांनी घसरून 4,103 रुपयांवर आला आहे. सोलानाबद्दल बोलायचे तर, ही लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी गेल्या 24 तासांत 0.29 टक्क्यांनी वाढून 7,352 रुपये झाली आहे. XRP 0.47 टक्क्यांनी 48.82 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, Axie 1.15 टक्क्यांनी घसरून 3,779.95 रुपयांवर व्यवहार करत आहे.

हे विधेयक आणण्याची होती सरकारची योजना 

सरकारने क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यासाठी सूचीबद्ध केले होते. पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठीही त्याची यादी करण्यात आली होती, परंतु सरकारने त्यावर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याने ते मांडता आले नाही.

अलीकडच्या काळात गुंतवणूक म्हणून क्रिप्टोकरन्सी हा लोकांमध्ये लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आला आहे. विशेषत: तरुण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहे. मात्र, यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे. कारण त्याच्या किमतीत चढ-उतार होत राहतात. त्यामुळे यामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याबाबत सखोल माहिती घ्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी