Cryptocurrency Prices | बिटकॉइनमध्ये तेजी, इथेरियम आणि पोल्काडॉटच्या किंमतीत वाढ

Cryptocurrency | बिटकॉइनपाठोपाठ इथेरियममध्येदेखील तेजी आली आहे. इथेरियम ०.८६ टक्क्यांच्या तेजीसह वधारला आहे. तर कार्डेनोच्या किंमतीत ३.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. पोल्काडॉट ५.२२ टक्क्यांनी वधारला आहे. शिवाय लाइटकॉइनच्या किंमतीत १.९६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र टेथरने ०.५४ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. त्याचबरोबर सोलानामध्ये मागील २४ तासात ३.३२ टक्के उसळी आली आहे. एक्सआरपीच्या किंमतीत २४ तासात १.२१ टक्के घसऱण झाली आहे.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनच्या किंमतीत तेजी
  • इथेरियमच्या किंमतीत झाली वाढ
  • क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ विस्तारते आहे

Bitcoin Price | नवी दिल्ली: जागतिक क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin price)वाढ नोंदवण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजारमूल्य (Crptocurrency Market Capitalisation)मागील २४ तासात ०.८१ टक्क्यांनी वाढून २.२३ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. तर बिटकॉइनचा क्रिप्टोकरन्सीमधील वाटा ०.१८ टक्क्यांनी घटून ३९.९१ टक्क्यांवर पोचला आहे. अर्थात बिटकॉइनमध्ये मात्र तेजी नोंदवण्यात आली. बाजारमूल्याच्या दृष्टीने बिटकॉइन (Bitcoin) ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. सध्या बिटकॉइन ४६,८९१.१६ डॉलरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. (Bitcoin price increases, trades on $ 46,891.16)

कार्डेनो, पोल्काडॉटमध्ये तेजी

बिटकॉइनपाठोपाठ इथेरियममध्येदेखील तेजी आली आहे. इथेरियम ०.८६ टक्क्यांच्या तेजीसह वधारला आहे. तर कार्डेनोच्या किंमतीत ३.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. पोल्काडॉट ५.२२ टक्क्यांनी वधारला आहे. शिवाय लाइटकॉइनच्या किंमतीत १.९६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र टेथरने ०.५४ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. त्याचबरोबर सोलानामध्ये मागील २४ तासात ३.३२ टक्के उसळी आली आहे. एक्सआरपीच्या किंमतीत २४ तासात १.२१ टक्के घसऱण झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीचे नियमन 

सध्याच्या या हंगामात क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात तेजी आली आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजारमूल्य  २.२३ ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर आहे. केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, २०२१ संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याचे ठरवले होते. मात्र हे बिल संसदेत सादर झाले नाही. सरकारने यावर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये मागील काही वर्षात मोठी लोकप्रियता आली आहे. खासकरून तरुण याकडे आकर्षित होत आहेत. अर्थात यात खूप चढउतार असल्याने सावध राहण्याची आवश्यकता आहे.

क्रिप्टोकरन्सीवर सरकारची भूमिका

सध्या केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासाठी एका विधेयकावर काम सुरू आहे. यामध्ये आरबीआयच्या कामाचादेखील समावेश आहे. सध्या भारतात क्रिप्टोकरन्सी आणि त्याच्या बाजारपेठेवर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारच्या क्षेत्राचे नियमन कसे करायचे याची चर्चा सुरू आहे.

मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि डिजिटल करन्सी (Digital Currency) हा जगभरच चर्चेचा विषय झाला आहे. अनेक देश यावर काम करत आहेत. भारताच्या क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)दीर्घ काळापासून काम करते आहे. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बॅंका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि इंग्लंडच्या सेंट्रल बॅंका क्रिप्टोकरन्सीच्या विविध शक्यतांवर काम करत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित क्रिप्टोकरन्सीने जागतिक वित्तीय बाजारपेठेचा अंदाज चुकवला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये चढउतार मोठ्या प्रमाणात असल्याने याबद्दल तज्ज्ञ सावध राहण्यास सांगत असले तरी दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सीचे विश्व झपाट्याने विस्तारते आहे. क्रिप्टोकरन्सीमधील जगभरातील गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढत चालले आहे. यावर्षी क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी