Cryptocurrency Prices : बिटकॉइन कोसळले ३० हजारांच्या खाली, काल घेतली होती 5.33 टक्क्यांची उसळी

Bitcoin update : क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेला सध्या ग्रहण लागले आहे. सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrencies) जबरदस्त घसरण झाली आहे. त्यातही बिटकॉइनची किंमत (Bitcoin Price)प्रचंड घटली आहे. काल तेजी दाखवणारे बिटकॉइन आज पुन्हा घसरले आहे. एक दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी बिटकॉइनमध्ये तेजी होती. बिटकॉइन 1530.09 किंवा 5.33 टक्के वाढीसह 30204.92 डॉलरवर होते.

cryptocurrency market
क्रिप्टोककरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइनच्या मूल्यात जबरदस्त घसरण
  • बिटकॉइन 30,000 डॉलरच्या पातळीवर
  • सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण

Bitcoin Price latest : नवी दिल्ली: क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेला सध्या ग्रहण लागले आहे. सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrencies) जबरदस्त घसरण झाली आहे. त्यातही बिटकॉइनची किंमत  (Bitcoin Price)प्रचंड घटली आहे. काल तेजी दाखवणारे बिटकॉइन आज पुन्हा घसरले आहे. एक दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी बिटकॉइनमध्ये तेजी होती. बिटकॉइन 1530.09 किंवा 5.33 टक्के वाढीसह 30204.92 डॉलरवर होते. त्याच वेळी, बिटकॉइनमध्ये आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बिटकॉइन 30,000 डॉलरच्या खाली घसरले आहे. (Bitcoin reaches the level of $30,000 today, all other cryptocurrencies show fall)

अधिक वाचा : Mehul Choksi : डोमिनिकन सरकारकडून मेहुल चोक्सीला दिलासा, डोमिनिकामधील बेकायदेशीर प्रवेशाची केस रद्द

खरं तर, शनिवारी, जगातील सर्वात मोठी आणि लोकांची आवडती क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये आज 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता, बिटकॉइन 29258.10 डॉलरच्या पातळीवर होते. ही घट नोंदवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी आतापर्यंत बिटकॉइनमध्ये 36 टक्क्यांची घसरण झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्याचे मूल्य 69000 डॉलर इतके होते, जे आता लक्षणीयरीत्या खाली आले आहे.

क्रिप्टोमधील गुंतवणूक

ग्लोबल क्रिप्टो फंडांनी या आठवड्यात या वर्षीचा विक्रमी साप्ताहिक निव्वळ प्रवाह (निव्वळ गुंतवणूक) पाहिला आहे. गेल्या आठवड्यात (मे 7-13) एकूण 27.4 कोटी डॉलरची जागतिक क्रिप्टो फंडांमध्ये गुंतवणूक करताना दिसले. हे स्पष्ट करते की गुंतवणूकदारांना यावेळी क्रिप्टो फंडांमध्ये गुंतवणूक करण्याच्या चांगल्या संधी दिसत आहेत. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. जगातील सर्वात मोठी क्रिप्टो मालमत्ता असलेल्या बिटकॉइनमध्ये गेल्या आठवड्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या क्रिप्टोमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण 29.9 कोटी डॉलर गुंतवलेले दाखवले आहे.

अधिक वाचा : CNG Latest Rate: सहा दिवसांत दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दरवाढ

इतर क्रिप्टोकरन्सी

दुसरीकडे, आपण इतर क्रिप्टोकरन्सी पाहिल्यास, शनिवारी इथर 2.7 टक्क्यांनी खाली 1,963.42 डॉलरवर दिसत आहे. त्याच वेळी, पोल्काडॉट 9.68 डॉलरच्या स्तरावर 3 टक्क्यांनी घसरत आहे. त्याचप्रमाणे, सोलाना  49.89 डॉलरवर 4 टक्क्यांहून अधिक घट नोंदवत आणि शिबा इनू  0.000001159 डॉलरवर 2 टक्क्यांची घट नोंदवत खाली आलेले दिसते आहे. त्याच वेळी, Dogecoin 0.084424 डॉलरवर 2.7 टक्क्यांची घसरण नोंदवत आले आहे.

अधिक वाचा : Aeroplane Facts : विमान उंचीवर पोहोचताच पायलट झोपतात, जाणून घ्या विमानाशी संबंधित विचित्र सत्य जे विमान कंपन्या लपवतात...

फक्त बिटकॉइनच नाही तर जगातील सर्वच प्रमुख क्रिप्टोकरन्सी जोरात आपटल्या आहेत. इथेरियम (Ethereum) , सोलाना (Solana)आणि कार्डानो (Cardano) जोरदार घसरले आहेत. Dogecoin आणि Shiba Inu सारख्या Memecoins ला देखील याचा फटका बसला. तर दुसरीकडे इलॉन मस्कचे आवडते क्रिप्टो टोकन, डॉजकॉइन,देखील घसरले आहे. अलीकडच्या काळात तेजीत असणारे शिबा इनू 6 टक्क्यांहून अधिक क्रॅश झाले आहे. क्रिप्टोकरन्सी गंडल्यामुळे जगभरातील गुंतवणुकदार चिंताग्रस्त झाले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या कुठवर जाऊन थांबणार याचीच चिंता गुंतवणुकदारांना लागली आहे. त्यामुळे आता गुंतवणुकदारांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाजारातील तीव्र नकारात्मक भावनांमध्ये त्यांनी त्यांची गुंतवणूक ठेवावी की क्रिप्टोकरन्सी विकून टाकाव्यात यावर तज्ज्ञांनी त्यांचे मत दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी