Cryptocurrency prices today | नवी दिल्ली : आज बिटकॉइनच्या किंमतीत (Bitcoin price) २ टक्क्यांची वाढ झाली. बिटकॉइनची किंमत २.०८ टक्क्यांनी वाढून ५०,९३० डॉलरच्या पातळीवर पोचली. त्याचबरोबर युनिस्वॅप, स्टेलर आणि एक्सआरपीसारख्या इतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील (Cryptocurrency prices)चांगलीच वाढ झाली आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ (Global Cryptocurrency market)आता ९६२.१०९ अब्ज डॉलरने वाढून २.४० ट्रिलियन डॉलरवर पोचली आहे. (Bitcoin rises by 2 % while & Uniswap, Stellar & XRP gain up to 13.75%)
स्टेलर या डिजिटल टोकनच्या किंमतीत ३.१० टक्क्यांची वाढ होत ते ०.२९५७ डॉलरवर पोचले आहे. तर लाइटकॉइनच्या किंमतीत ०.८६ टक्क्यांची वाढ होत ते १५६.०८ डॉलरवर पोचले आहे. एक्सआरपीच्या किंमतीत ०.७३ टक्क्यांची वाढ होत ते ०.९२२३ डॉलरवर पोचली आहे. युनिस्वॅपदेदखील १३.७५ टक्क्यांनी वाढून १९.०८ डॉलरवर पोचले आहे.
ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्से यांनी म्हटले आहे की बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी अमेरिकेच्या डॉलरला पर्याय बनून डॉलरची जागा घेईल. डोर्से हे बिटकॉइनचे खंदे समर्थक आहे. त्याचबरोबर इलॉन मस्क आणि कॅथी वूड यांच्या कॉमेंट्सनंतर क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत तेजी आली आहे. जुलै महिन्यात मस्क यांनी सांगितले होते की टेस्ला लवकरच बिटकॉइनच्या स्वरुपात पेमेंट स्वीकारण्याची सुरूवात करण्याची शक्यता आहे.
जागतिक वित्तीय बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातदेखील मोठी अनिश्चितता निर्माण होत क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत चढ उतार होत आहेत. वाढत्या महागाईमुळे जगभरातील शिखर बॅंकांना आपले पतधोरण कडक करावे लागणार आहे. त्यामुळे जागतिक वित्तीय बाजारातील पैशाचा ओघ आटू शकतो.
इथेरियम ब्लॉकचेन नेटवर्क आधारित असलेल्या इथरच्या किंमतीतदेखील चढ उतार सुरू आहे. क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ जवळपास २.४० ट्रिलियन डॉलरवर आली आहे. मागील महिन्यातच क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ ३ ट्रिलियन डॉलरच्या पार झाली होती. त्यावेळेस बिटकॉइनची किंमत विक्रमी ६९,००० डॉलरच्या पातळीवर पोचली होती. मात्र या आठवड्यात जगभरातीलच वित्तीय बाजारात चढ उतार झाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारात आणि अमेरिकेच्या बॉंड्सच्या परताव्यात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील रोजगारातील घट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा जगभरातील फैलाव यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराबरोबर शेअर बाजारातील गुंतवणुकदारदेखील सावध झाले आहेत.
मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि डिजिटल करन्सी (Digital Currency) हा जगभरच चर्चेचा विषय झाला आहे. अनेक देश यावर काम करत आहेत. भारताच्या क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)दीर्घ काळापासून काम करते आहे. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बॅंका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि इंग्लंडच्या सेंट्रल बॅंका क्रिप्टोकरन्सीच्या विविध शक्यतांवर काम करत आहेत.