Gold Price : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीतही वाढ, जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

Retail Gold and Silver Rate| आजचे सोने चांदी दर । देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदली गेली.

biz gold price today gold spot price rise silver price also rises know prices On 3 may 2021
Gold Price : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदीतही वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदली गेली.
  • सोमवारी भारतीय रुपया एका डॉलरच्या तुलनेत  24 पैशांच्या घटीसह 74.33 वर ट्रेड करत होता. 
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याची जागतिक किंमती वाढ होऊ  प्रति औंस 1,777 डॉलरवर असल्याचे दिसून आले.

Retail Gold and Silver Rate | सोने चांदी दर ।  नवी दिल्ली : देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूंमध्ये वाढ नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 310 रुपयांची वाढ झाली. या वाढीसह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,580 रुपये केली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती मजबूत झाल्या आणि रुपयाच्या घसरणीमुळे देशांतर्गत स्तरावर ही वाढ नोंदविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या सत्रात सोन्याचा भाव दहा ग्रॅमच्या किंमतीवर 46,270 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्यासह चांदीच्या स्पॉट किंमतीतही सोमवारी वाढ नोंदविण्यात आली. चांदीच्या दरात 580 रुपयांची वाढ झाली. या वाढीसह चांदीचा दर 67,429 रुपये झाला. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात चांदीचा भाव प्रति किलो 66,849 रुपयांवर बंद झाला होता.

सोमवारी भारतीय रुपया एका डॉलरच्या तुलनेत  24 पैशांच्या घटीसह 74.33 वर ट्रेड करत होता. 

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याची जागतिक किंमती वाढ होऊ  प्रति औंस 1,777 डॉलरवर असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर चांदीचा भाव औंसच्या तुलनेत 26.06 डॉलरवर वाढला.

देशांतर्गत वायदा बाजारात सोने

एमसीएक्स एक्सचेंजवर चार जून २०२१ चे  सोन्याचे दर 0.65 टक्के म्हणजे 305 रुपये  वाढून, 47,042 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेड करत होते. . त्याशिवाय 5 ऑगस्टला 2021 वायदा सोन्याचा भाव सोमवारी संध्याकाळी 0.64 टक्क्यांनी म्हणून  299 रुपयांनी वाढून प्रति दहा ग्रॅम 47,350 रुपयांवर ट्रेड करताना दिसले. 

देशांतर्गत वायदा बाजारात चांदी

सोमवारी, 5 जुलै रोजी झालेल्या एमसीएक्स एक्सचेंजमध्ये 2021 फ्युचर्स चांदीचा भाव १.२१ टक्क्यांनी म्हणजे 824 रुपयांनी वाढून 69,190 रुपये प्रतिकिलो होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी