Success of south Indian films : बॉलीवूडच्या 'दिल चाहता है' या चित्रपटाने शोधून दिला दक्षिण भारतीय चित्रपटांना यशाचा राजमार्ग...पाहा कसे

Bollywood Box Office Failure : हिंदीमध्ये डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या (South Indian Films) अलीकडील बॉक्स ऑफिसवरील यशाचे आतापर्यंत चांगले दस्तऐवजीकरण झाले आहे. पण याचे श्रेय केवळ दक्षिणेतील चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांना नाही. जवळजवळ 25 वर्षांपासून डब चित्रपट बनवण्याचा ट्रेंड आहे. गंमत म्हणजे, याचे सूत्र सुपर-हिट हिंदी चित्रपट दिल चाहता है (Dil Chahta Hai) (2001) पर्यत जाते. फरहान अख्तरचे (Farhan Akhtar)दिग्दर्शनातील पदार्पण या चित्रपटाने झाले होते.

Where Bollywood Failed
बॉलीवूडचे अपयश आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे यश, कारण काय 
थोडं पण कामाचं
  • हिंदीमध्ये डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या (South Indian Films) अलीकडील बॉक्स ऑफिसवरील यशाची प्रचंड चर्चा
  • सुपर-हिट हिंदी चित्रपट दिल चाहता है पासून बॉलीवूडने केली घोडचूक
  • दाक्षिणात्य चित्रपट आणि अभिनेत्यांनी कसे काबीज केले मार्केट

Dil Chahta Hai role in south Indian films : नवी दिल्ली :  हिंदीमध्ये डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांच्या (South Indian Films) अलीकडील बॉक्स ऑफिसवरील यशाचे आतापर्यंत चांगले दस्तऐवजीकरण झाले आहे. पण याचे श्रेय केवळ दक्षिणेतील चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांना नाही. जवळजवळ 25 वर्षांपासून डब चित्रपट बनवण्याचा ट्रेंड आहे. गंमत म्हणजे, याचे सूत्र सुपर-हिट हिंदी चित्रपट दिल चाहता है (Dil Chahta Hai) (2001) पर्यत जाते. फरहान अख्तरचे (Farhan Akhtar)दिग्दर्शनातील पदार्पण या चित्रपटाने झाले होते. तीन मित्रांच्या कहाणीचा हा चित्रपट शहरी किंवा मल्टिप्लेक्समधून हिट झालेल्या सुरूवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे. उत्तरेकडील चित्रपट निर्मात्यांनी अनिवासी भारतीय आणि मेट्रो प्रेक्षकांना सेवा पुरवण्यास सुरुवात केली. हा भारतात मल्टीप्लेक्सची वाढ होण्याचा काळ होता. मल्टिप्लेक्समधील चकचकीत आणि धमाकेदारपणाचा अर्थ असा होता की तिकिटांची किंमत सिंगल-स्क्रीनच्या तुलनेत तिप्पट आहे. याचा तर्क असा होता की एक मल्टिप्लेक्सटा प्रेक्षक तीन सिंगल-स्क्रीन प्रेक्षकांच्या बरोबरीने आहे. (Bollywood movie Dil Chahta Hai showed a way to success of south Indian films)

अधिक वाचा : Taarak Mehata चे १४ वर्ष पूर्ण, दयाबेनच्या घरवापसीवर जेठालालाने म्हटलं....

दाक्षिणात्य चित्रपटांचे वितरण आणि धोरण

तसे, चीनच्या 80,000 च्या तुलनेत भारतात सुमारे 8,000 चित्रपट स्क्रीन आहेत. एक अंदाज आहे की देशातील 5,564 उपजिल्ह्यांपैकी 5,000 उपजिल्ह्यांमध्ये सिनेमागृह नाही. देशातील जवळपास निम्म्या स्क्रीन एकट्या दक्षिणेत आहेत, ज्यात सिंगल-स्क्रीनमध्ये म्हणजे नेहमीच्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती बहुतांशी अबाधित आहे. चित्रपट निर्माते एसएस राजामौली म्हणतात की "तेलुगू, तमिळ किंवा कन्नडमध्ये, आम्ही सिंगल-स्क्रीन प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवत राहिलो. कारण आम्ही फक्त एका राज्यासाठी चित्रपट बनवत आहोत आणि आम्हाला सर्व प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणायचे आहे."

अधिक वाचा : शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात ३ ऑगस्टला सुनावणी

बॉलीवूडची घोडचूक

दुसरीकडे, बॉलीवूडच्या वितरकांचे म्हणणे आहे की  बॉलीवूडने मल्टिप्लेक्सच्या तिकिटांमधून होणाऱ्या कमाईच्या नादात 75 टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष केले. ते विसरले की शहरी प्रेक्षकांकडे मनोरंजनाचे अनेक मार्ग आहेत. परंतु लहान शहरांसाठी मनोरंजन हे सहसा चित्रपटागृहात चित्रपट पाहणे आणि बाहेर खाणे यामध्येच असते. दरम्यानच्या काळात लोकसंख्येचा एक मोठा भाग बॉलीवूडपासून दूर झाला आहे. अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्याद्वारे त्यांना सेट मॅक्स आणि स्टार गोल्डमध्ये त्यांचे मनोरंजन मिळाले.

पुष्पा आणि KGF2चे उदाहरण

एका वितरकाने तर अलीकडच्या काळातील सुंदर उदाहरण दिले आहे.  पुष्पा: द राइज आणि KGF2 या दोन चित्रपटांनी हे अधोरेखित केले आहे. जेव्हा ओमिक्रॉनच्या निर्बंधांमुळे हिंदी चित्रपटांचा प्रवाह पुन्हा थांबला, तेव्हा पुष्पाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले आणि प्रदर्शकांना वाचवले. सुरुवातीला पुष्पाचे दोन ते तीनच शो होते. मात्र नंतर त्याचे शो वाढत गेले. KGF2 च्या विलक्षण मागणीची पूर्तता करण्यासाठी, उत्तरेतील चित्रपटगृहांनी आपले तिकीट दर 150 आणि 200 रुपयांवरून 200 आणि 250 रुपयांपर्यंत वाढवले. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

अधिक वाचा : TV Industry Richest Actress : 'ही' आहे टीव्ही जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी, ऐकून धक्का बसेल

उपग्रह चॅनेल, युट्युबद्वारे दक्षिणेचे कलाकार घराघरात

तेलगू चित्रपट आणि त्यातील कलाकार मग ते चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू किंवा अल्लू अर्जुन असोत- यांनी सॅटेलाइट टीव्ही आणि अलीकडेच, YouTube द्वारे हळूहळू हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला. दरम्यान, त्यांची कथाकथनशैलीही चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये स्वीकारली जात होती. दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉलीवूडवरील प्रभाव इतका जबरदस्त वाढत गेला होता की 2007-12 या कालावधीमधील अक्षय कुमार आणि सलमान खानचे सर्वात मोठे हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपट हे दक्षिण भारतीय चित्रपटांचे रिमेक होते. जेव्हा पुष्पा, RRR आणि KGF2 मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग आणि लोकांकडून स्वीकारल्या गेलेल्या नायकांसह एकापाठोपाठ पडद्यावर दिसले, तेव्हा प्रेक्षकांना वाळवंटात एक ओएसिस सापडला. आतापर्यंत, आम्हाला काही गैरसमज होते की अशा प्रकारचे चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये चांगले चालत नाहीत. दर्जेदार चित्रपट बहुधा प्रेक्षकांना आवडणार नाहीत. पण भव्य चित्रपट वर्गातील प्रेक्षकांना आवडतील. मात्र अलीकडच्या काळातील अनेक यशस्वी दाक्षिणात्य चित्रपटांनी अनेक गैरसमज हाणून पाडले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी