PAN Card Fraud | बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावला धक्का! अभिनेत्याचे पॅन कार्ड तपशील वापरून झाला फ्रॉड

Fraud Alert : पॅन कार्ड (Pan Card fraud) किंवा आधार कार्डच्या माहितीचा दुरुपयोग करून फ्रॉड करण्याची अनेक प्रकरणे हल्ली समोर येत असतात. बॉलीवूडचे (Bollywood)स्टारदेखील याला अपवाद नाहीत. बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Bollywood Actor Rajkumar Rao)पॅन कार्डच्या फसवणुकीचा नुकताच बळी ठरला आहे. बॉलीवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्याने ट्विटरवर त्याच्या बाबतीत करण्यात आलेल्या आर्थिक फसवणुकीची माहिती दिली.

Rajkumar Rao's PAN Card misused
राजकुमार रावचे पॅन कार्ड वापरून झाला फ्रॉड 
थोडं पण कामाचं
  • आपल्या पॅन कार्डचा गैरवापर करून फ्रॉड झाल्याचे राजकुमार रावचे ट्विट
  • सिबिलने राजकुमारच्या ट्विटला दिला प्रतिसाद
  • या वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनेही बनावट कर्ज प्रकरणात तिच्या पॅनकार्डचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

Rajkummar Rao's PAN details misused : नवी दिल्ली : पॅन कार्ड (Pan Card fraud) किंवा आधार कार्डच्या माहितीचा दुरुपयोग करून फ्रॉड करण्याची अनेक प्रकरणे हल्ली समोर येत असतात. बॉलीवूडचे (Bollywood)स्टारदेखील याला अपवाद नाहीत. बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Bollywood Actor Rajkumar Rao)पॅन कार्डच्या फसवणुकीचा नुकताच बळी ठरला आहे. बॉलीवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्याने ट्विटरवर त्याच्या बाबतीत करण्यात आलेल्या आर्थिक फसवणुकीची माहिती दिली. या फ्रॉडमध्ये राजकुमार रावच्या पॅन कार्ड तपशीलाचा गैरवापर करून त्याच्या नावावर कर्ज घेण्याचा प्रकार घडला आहे. (Bollywood Star Rajkumar Rao faces Pan Card fraud, actor tweeted about it)

अधिक वाचा : Indian Railways update | आरक्षण असूनही बर्थ न दिल्याबद्दल भारतीय रेल्वे, प्रवाशाला देणार एक लाख रुपये

राजकुमार रावचे ट्विट

या 37 वर्षीय आघाडीच्या अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या पॅन कार्डच्या तपशीलांचा त्याच्या नावावर 2500 रुपयांचे छोटे कर्ज घेण्यासाठी गैरवापर करण्यात आला. राजकुमार रावने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की  “#FraudAlert माझ्या पॅन कार्डचा गैरवापर करण्यात आला आहे आणि माझ्या नावावर रु.2500 चे छोटे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या सिबिल स्कोअरवर परिणाम झाला आहे,” त्याच्या पॅन तपशीलांसह होत असलेल्या फसवणुकीच्या व्यवहारांची जाणीव करून देण्यासाठी त्याने क्रेडिट एजन्सी CIBIL ला देखील टॅग केले. “@CIBIL_Official कृपया ते दुरुस्त करा आणि याविरुद्ध सावधगिरीची पावले उचला,” अशी विनंती राजकुमार रावने क्रेडिट एजन्सीला केली.

अधिक वाचा : Pune Real Estate | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करणे होणार महाग...पाहा काय आहे कारण

सिबिलचा राजकुमारच्या ट्विटला प्रतिसाद

CIBIL ने अलीकडेच राव यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. राजकुमार राव सध्या  'हिट', 'मोनिका, ओ माय डार्लिंग' आणि 'भिड' सारख्या चित्रपटांवर काम करत आहेत. राजकुमार रावला दिलेल्या प्रतिसादात सिबिलने म्हटले आहे की “तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. हा अनुभव तुम्हाला यावा असे वाटत नाही. वर क्लिक करून तुमच्या TUCIBIL अहवालात प्रतिबिंबित होणारा चुकीचा खाते क्रमांक आम्हाला DM करण्याची विनंती करा,” 

अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर! DA नंतर वाढणार HRA...होणार थेट 20,484 रुपयांचा फायदा

सनी लिओनीलाही बसला होता फटका

अर्थात राजकुमार राव हा काही पहिलाच बॉलिवूड सेलिब्रिटी नाही की ज्याने पॅन कार्डच्या तपशीलाचा गैरवापर झाल्याची तक्रार केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनेही कर्ज फसवणुकीत तिच्या पॅनकार्डचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता.  एका ट्विटमध्ये, जे आता हटवण्यात आले आहे, लिओनीने म्हटले होते की, तिच्या पॅन कार्डचा तपशील कोणीतरी 2,000 रुपयांचे कर्ज घेण्यासाठी वापरला आहे. तिने एका ट्विटमध्ये म्हटले होते, “एका मूर्ख व्यक्तीने माझ्या पॅनचा 2000 रुपयांचे कर्ज घेण्यासाठी वापर केला आहे.” तिने आता हटवलेल्या ट्विटमध्ये असेही नमूद केले आहे की एका वित्तीय कंपनीने तिला या परिस्थितीत मदत करण्यासाठी “काहीही” केले नाही.

अलीकडच्या काळात पॅन कार्ड किंवा आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार किंवा फसवणूक करण्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. त्यामुळेच तुम्ही तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती कोणालाही देऊ नका जेणेकरून तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी