Bollywood Stars | हे बॉलीवूड स्टार रिअल एस्टेटमधून करतायेत जबरदस्त कमाई...पाहा दरमहा किती मिळतेय उत्पन्न

Bollywood Earning from Real Estate | रिअल इस्टेटविषयीचे हे आकर्षण फक्त सर्वसामान्य गुंतवणुकदारांनाच नव्हे तर बॉलीवूडच्या आघाडीच्या स्टार्सनादेखील (Bollywood star) आहे. बॉलीवूड स्टार रिअर इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करून दणकून कमाई करत आहेत. यामध्ये सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar), ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), काजोलपासून ते अमिताभ बच्चनपर्यत (Amitabh Bachchan) सर्वच कलाकारांचा समावेश आहे.

Bollywood Earning from Real Estate
बॉलीवूडची रिअल इस्टेटमधून कमाई 
थोडं पण कामाचं
  • रिअल इस्टेटचे सर्वांनाच आकर्षण
  • बॉलीवूड स्टारची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक
  • बॉलीवूड स्टार्स भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीतून दरमहा करतायेत मोठी कमाई

Bollywood Earning from Real Estate | मुंबई : रिअल इस्टेट (Real estate) हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय पर्याय (Popular investment) आहे. अनेकजण कोणत्यातरी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. रिअल इस्टेटविषयीचे हे आकर्षण फक्त सर्वसामान्य गुंतवणुकदारांनाच नव्हे तर बॉलीवूडच्या आघाडीच्या स्टार्सनादेखील (Bollywood star) आहे. बॉलीवूड स्टार रिअर इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करून दणकून कमाई करत आहेत. यामध्ये सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar), ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), काजोलपासून ते अमिताभ बच्चनपर्यत (Amitabh Bachchan) सर्वच कलाकारांचा समावेश आहे. पाहूया हे स्टार कशी कमाई करतायेत ते. (Bollywood stars are big money from real estate)

काजोलची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक

काजोलने मुंबईतील आपले एक अपार्टमेंट दोन वर्षांसाठी भाड्याने दिले आहे. यातून काजोलला दर महिन्याला ९०,००० रुपयांचे भाडे मिळते आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन्समध्ये अटलांटिस प्रोजेक्टमध्ये २१ व्या मजल्यावरील हा फ्लॅट ७७१ चौ. फूटांचा आहे. हा फ्लॅट घेणाऱ्याने यासाठी ३ लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिटदेखील जमा केले आहे.

सलमान खानची गुंतवणूक आणि कमाई

याचवर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला सलमान खाने मुंबईत आपला एक फ्लॅट ९५,००० रुपये प्रति महिन्याने भाड्याने दिला आहे. यासाठी ३३ महिन्यांचा करार करण्यात आला आहे. हा फ्लॅट मुंबईतील बांद्रा वेस्ट शिव अस्थान हाइट्समध्ये आहे. १४व्या मजल्यावरील या फ्लॅटचे क्षेत्रफळ ७५८ चौ.फूट आहे. यासाठी २.५८ लाख रुपयांचे डिपॉझिट जमा करण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कमाई

अमिताभ बच्चन आणि अभिषेत बच्चन यांनी मुंबईतील जुहू येथील वत्स आणि अम्मू बंगल्याचा तळमजला भाड्याने दिला आहे. त्यांनी यासाठी १५ वर्षांचा करार केला आहे. यातून त्यांना १८.९ लाख रुपये प्रति महिना इतके उत्पन्न मिळते आहे. सप्टेंबर २०२१मध्येच हा करार झाला आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी मुंबईत एक ड्युप्लेक्स अभिनेत्री कृति सनोनला भाड्याने दिला आहे. या प्रॉपर्टीला दोन वर्षांसाठी १० लाख रुपये प्रति महिन्याने दिले आहे. हा फ्लॅट अटलांटिस बिल्डिंगमध्ये २७ आणि २८ व्या मजल्यावर आहे. सनोनने ६० लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट जमा केले आहे.

सैफ अली खान

सैफने मुंबईतील बांद्रा येथील आपला एक फ्लॅट ३.५ लाख रुपये प्रति महिन्याने भाड्याने दिला आहे. ऑगस्टमध्ये सैफ हा फ्लॅट भाड्याने दिला आहे. एका कंपनीला हा फ्लॅट भाड्याने देण्यात आला आहे. यासाठी १५ लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करण्यात आले आहे. हा फ्लॅट १,५०० चौ. फूटांचा आहे. 

स्टेट बॅंकेने अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या एका बिल्डिंगमधील तळमजला १५ वर्षांच्या भाडेकरारावर घेतला आहे. यासाठी एसबीआय बच्चन यांना दरमहा १८.९ लाख रुपयांचे भाडे देणार आहे. शिवाय भाड्यामध्ये दर पाच वर्षांनी २५ टक्के वाढ केली जाणार आहे. Zapkey.com या एका संकेतस्थळाने या करारासंदर्भातील माहिती मिळवत प्रकाशित केली आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये एसबीआयला दर महिन्याला १८.९ लाख रुपये अमिताभ बच्चन यांना द्यावे लागतील. तर पुढील पाच वर्षांमध्ये भाडे वाढून २३.६२ लाख रुपये होईल आणि शेवटच्या पाच वर्षात २९.५३ टक्के भाडे एसबीआय बच्चन कुटुंबाला देणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी