एलपीजी गॅसवर जबरदस्त ऑफर, फक्त ९ रुपयांत मिळवा सिलिंडर, जाणून घ्या बुकिंग कसे करायचे

काम-धंदा
Updated Apr 18, 2021 | 22:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर जबरदस्त कॅशबॅक मिळेल. यामुळे तुम्हाला एलपीजी गॅस कमी किंमतीत मिळू शकेल.

LPG cylinder in just Rs 9, check how to book cylinder
एलपीजी सिलिंडर फक्त ९ रुपयांत, पेटीएमची जबरदस्त ऑफर 

थोडं पण कामाचं

  • एलपीजी सिलिंडरवर जबरदस्त ऑफर
  • पेटीएमने आणली ग्राहकांसाठी खास योजना
  • मिळवा कॅशबॅक

नवी दिल्ली : एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्य बजेटच कोलमडले आहे. सध्या एलपीजी सिलिंडर जवळपास ८०९ रुपये प्रति सिलिंडर या दराने मिळते आहे. महागाईचा बोझा कमी करण्यासाठी पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या योजनेचे नाव 'फर्स्ट टाईम' असे आहे. या योजनेअंतर्गत एटीएम अॅपवरून सिलिंडर बुकिंगवर मोठा कॅशबॅक मिळेल. त्यामुळे ग्राहक फक्त ९ रुपयांत एलपीजी सिलिंडर विकत मिळणार आहे.

पेटीएमची ऑफर


या 'फर्स्ट टाईम' ऑफरचा लाभ फक्त पेटीएम अॅप वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. ही ऑफर ३० एप्रिल २०२१ पर्यत उपलब्ध आहे. म्हणजे या महिन्यात तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर जबरदस्त कॅशबॅक मिळेल. यामुळे तुम्हाला एलपीजी गॅस कमी किंमतीत मिळू शकेल.
यासाठी ग्राहकांना काही मुद्दे लक्षात घ्यावे लागणार आहेत.

पहिल्या सिलिंडर बुकिंगवर मिळेल फायदा


ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांसाठी आहे जे पेटीएम अॅपद्वारे पहिल्यांदाच एलपीजी सिलिंडर विकत घेणार आहेत किंवा बुकिंग करणार आहेत. या योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही गॅस बुकिंगसाठी पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला ८०० रुपयांपर्यत कॅशबॅकवाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल. या कॅशबॅकमध्ये मिळणारी रक्कम १० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यत असू शकते. म्हणूनच तुमच्या कार्डमध्ये किती रकमेचा कॅशबॅक मिळाला आहे हे कळण्यासाठी तुम्हाला आपले स्क्रॅच कार्ड ओपन करावे लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या स्क्रॅच कार्डला सात दिवसांच्या आत ओपन करणे आवश्यक असेल अन्यथा हे कार्ड अपात्र ठरेल.

स्क्रॅच कार्डचा वापर कसा करावा


स्क्रॅच कार्डमध्ये जितक्या रकमेचा उल्लेख असेल तितका लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या पेटीएम अकाउंटवर लॉग इन करावे लागेल आणि 'शो मोअर' ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर रिचार्ज अॅंड पे बिल्सवर क्लिक करा, त्यानंतर एक पॉप अप 'बुक ए सिलिंडर' दिसेल. इथे तुम्हाला गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल आणि पेमेंट करण्याआधी प्रोमो कोड - FIRSTLPG द्यावा लागेल. यामध्ये तुमच्या एकूण रकमेवर तुम्हाला डिस्काउंट मिळेल.

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा सध्या भारतात मोठा विस्तार होतो आहे. यामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या सेवा सुरू केल्या आहेत. छोटी शहरे आणि ग्रामीण भागातही याचा विस्तार होतो आहे. यातून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक डिजिटल पेमेंट कंपन्या विविध ऑफर्स ग्राहकांसाठी आणत असतात. पेटीएमला सध्या फोन पे, गुगल पे यासारख्या इतर कंपन्यांशी जबरदस्त स्पर्धा करावी लागते आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या ऑफर ग्राहकांसाठी आणत आहेत. मागील काही वर्षात डिजिटल इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. त्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यत डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणात पोचल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी