Akshata Murthy Latest : ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना इन्फोसिसच्या लाभांशातून मिळणार 64 कोटी

Akshata Murthy Income : देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस लि.ने (Infosys Ltd) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 16.50 रुपये लाभांश जाहीर केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनाही इन्फोसिसच्या या अंतरिम लाभांशाचा फायदा होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अक्षता मूर्तीकडे सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एकूण 3,89,57,096 शेअर्स आहेत.

Rishi Sunak & Akshata Murthy
ऋषी सुनक आणि अक्षता मुर्ती 
थोडं पण कामाचं
  • अक्षता मुर्ती यांच्या या नारायण मुर्तींच्या कन्या आहेत
  • अक्षताकडे इन्फोसिसचे कोट्यवधी शेअर्स आहेत.
  • इन्फोसिसच्या लाभांशातून अक्षताची दणदणीत कमाई होणार

Infosys Dividend : नवी दिल्ली : सध्या भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) चर्चेत आहेत. ते चर्चेत असण्यामागे आणखी एक कारण आहे. ते भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Nayayan Murthy) यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांच्या पत्नी आणि नारायण मुर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती (Akshata Murthy)यांना इन्फोसिसच्या लाभांशातून 64 कोटी रुपयांची दणदणीत कमाई होणार आहे. कारण देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस लि.ने (Infosys Ltd) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 16.50 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याचा अर्थ 28 ऑक्टोबरपर्यंत ज्यांच्याकडे इन्फोसिसचे शेअर्स आहेत त्यांना या अंतरिम लाभांशाचा फायदा होणार आहे. कंपनीच्या भागधारकांना लाभांशाचा फायदा होत असतो. जितके जास्त शेअर्स तुमच्याकडे असतील तितकाच जास्त लाभांश तुम्हाला मिळतो. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनाही इन्फोसिसच्या या अंतरिम लाभांशाचा फायदा होणार आहे. यातून त्यांची कोट्यवधींची कमाई होणार आहे. (British PM Rishi Sunak's wife Akshata Murthy to get Rs 64 crore as Infosys dividend)

अधिक वाचा : Marriage by cheating: गुंगीचा लाडू देऊन अल्पवयीन मेहुणीचं अपहरण, जबरदस्तीनं केलं लग्न

शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार आणि समोर आलेल्या माहितीनुसार अक्षता मूर्तीकडे सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एकूण 3,89,57,096 शेअर्स आहेत. कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या हे प्रमाण 1.07 टक्के इतके आहे. 

अक्षता मुर्तीचे उत्पन्न

नारायण मुर्ती यांच्या इन्फोसिसने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 16.50 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे 3,89,57,096 शेअर्स आहेत. इन्फोसिसच्या या अंतरिम लाभांशातून अक्षता मूर्तींना 64,27,92,084 रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

अधिक वाचा : Mood swing remedies: वारंवार का होतात मूड स्विंग? करा हे सोपे उपाय

रेकॉर्ड डेट

इन्फोसिसच्या भागधारकांना लाभांश मिळण्यासाठीची रेकॉर्ड तारीख कंपनीने जाहीर केली आहे. यासंदर्भात शेअर बाजाराला माहिती देताना इन्फोसिसने सांगितले की, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति शेअर 16.50 रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभांशासाठी रेकॉर्ड डेट 28 ऑक्टोबर आहे. तर या लाभांशाची रक्कम भागधारकांना 10 नोव्हेंबरपर्यंत दिली जाईल.

अक्षता मुर्ती आता डबल हायप्रोफाइल झाल्या आहेत. एकीकडे त्या आधीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. तर आता त्यांचे पती ऋषी सुनक हे सध्या ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.अक्षता मूर्ती या  इन्फोसिसमध्ये त्यांचा 1.07 टक्के हिस्सा आहे. ऋषी सुनक हे ब्रिटिश नागरिक असून त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या मात्र भारतीय नागरिक आहे. ब्रिटनची नागरिक नसल्यामुळे, अक्षता मूर्ती ब्रिटनमध्ये कर न भरता 15 वर्षे परदेशातून पैसे कमावू शकतात.

अधिक वाचा : सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पंजाबी गायिका अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

अक्षता मूर्तींचे करियर

अक्षता मूर्ती यांनी लॉस एंजेलिसच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडायझिंगमधून फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्यांनी डेलाइट आणि युनिलिव्हरमध्येही त्यांनी काही काळ काम केले आहे. त्यानंतर अक्षताने स्टँडफोर्टमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला होता. तिथेच त्यांची भेट ऋषी सुनक यांच्याशी झाली. त्यानंतर या दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. ऋषी सुनक बिटनचे पंतप्रधान झाल्यामुळे आता अक्षता मूर्ती चर्चेत आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी