BSNL आणि MTNL संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय 

BSNL MTNL merger: टेलिकॉम कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या संदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कॅबिनेटने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलिनीकरणाची घोषणा केली आहे.

bsnl mtnl merger central government proposed plan ravi shankar prasad business news
BSNL आणि MTNL संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सरकारने बीएसएनएल-एमटीएनएलच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे
  • दोन्ही कंपन्या बंद होणार नाही, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती
  • केंद्र सरकार आणणार आकर्षक व्हीआरएस स्कीम

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एक खास योजना आखली आहे. सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल (MTNL) यांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी सुद्धा दिली आहे.

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत बीएसएनएल-एमटीएनएलच्या विलिनीकरणाची माहिती दिली आहे. रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बीएसएनल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांपैकी कुठलीही कंपनी बंद होणार नाहीये. तसेच दोन्ही कंपन्यांतील गुंतवणूक सुद्धा कमी होणार नाहीये. तर, एनटीएनएलचं बीएसएनएलमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. 

यासोबतच रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, "बीएसएनएल, एमटीएनएल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांना आर्थिक संकटातून बाहेर आणण्यासाठी १५,००० कोटी रुपयांचे सरकारी बाँड काढण्यात येणार आहेत, ३८,००० कोटी रुपयांची संपत्ती मॉनेटाइजसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस)साठी वापरण्यात येणार आहेत".

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड म्हणजेच एमटीएनएल दिल्ली आणि मुंबईत आपली सेवा देत आहे. तर भारत संचार निगम लिमिडेट (BSNL)दिल्ली आणि मुंबई वगळता संपूर्ण देशभरात आपली सेवा पूरवतात. 

सरकारने बीएसएनएलला २,९९३७ कोटी रुपये देणार आहे. रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "BSNL आणि MTNL यांच्या संदर्भात सरकारची योजना अगदी स्पष्ट आहे. दोन्ही कंपन्या या भारताच्या एक महत्वाच्या संपत्ती आहेत". 

कधी होणार BSNL-MTNL विलिनीकरण

रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बीएसएनएल आणि एमटीएनएल यांचं विलिनीकरण होण्यास आणखीन काही काळ लागेल. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत एमटीएनएल कंपनी ही बीएसएनएलची सबसिडीअरी कंपनीच्या रुपात काम करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी