'मेरा वतन- डल झील में खिलते कमल जैसा', भाषणात अर्थमंत्र्यांनी ऐकवली कविता

काम-धंदा
Updated Feb 01, 2020 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

FM Nirmala Sitharaman poem in budget speech: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट भाषणात आज एक विशेष कविता ऐकवली. जाणून घ्या काय म्हणाल्या अर्थमंत्री...

FM Nirmala Sitaraman
बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी ऐकवली दमदार कविता  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुख-समृद्धीचं प्रतिक असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसून सादर केलं बजेट
  • बजेट सादर करण्यापूर्वी दिवंगत भाजप नेते माजी अर्थमंत्री अरुण जेटलींना वाहिली श्रद्धांजली.
  • बजेटमध्ये 'मेरा वतन' नावाची कविता सादर करून अर्थमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मनं

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचं २०२०-२१ सालचं बजेट सादर केलंय. आपल्या बजेट भाषणात अर्थमंत्र्यांनी एक कविता ऐकवली. या कवितेचं शीर्षक होतं ‘वतन’. अर्थमंत्र्यांनी जेव्हा कविता वाचली तेव्हा संसदेत टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अत्यंत साध्या वेशामध्ये आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. यावेळी त्या पिवळ्या रंगाच्या साडीत लाल वहीत बजेट घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या.

वसंत पंचमीनंतर आज रथसप्तमीच्या दिवशी बजेट २०२०-२१ सादर झालं. हेच निमित्त साधून निर्मला सीतारमन यांनी नेसलेली पिवळ्या रंगाची साडी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. पिवळा रंग सुख-समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. निर्मला सीतारामन यांची बजेट सादर करण्याची पद्धत मागील काही अर्थमंत्र्यांच्या तुलनेत खूप वेगळी होती. यापूर्वी गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं होतं. त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी गोल्डन बॉर्डर असलेली गुलाबी रंगाची साडी नेसली होती.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नव्या दशकातील पहिलं बजेट सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचं अभिनंदन केलं.

पाहा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेली कविता-

“हमारा वतन खिलते शालीमार बाग जैसा,

हमारा वतन डल झील में खिलते कमल जैसा,

नौजवानों के गर्म खून जैसा,

मेरा वतन- तेरा वतन,

हमारा वतन-दुनिया का सबसे प्यारा वतन”|

आपल्या बजेटची सुरूवात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी अर्थमंत्री दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांनी श्रद्धांजली वाहून केली. यावेळी देशातील आर्थिक सुधारणांमध्ये अरुण जेटली यांच्या सहभागाविषयीचा उल्लेख केला.

लाल रंगाच्या बस्तामध्ये बजेटची कागदपत्र

गेल्यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टीनं लोकांचं लक्ष वेधलं होतं ते म्हणजे अर्थमंत्री सीतारमन यांनी ब्रीफकेस ऐवजी बस्तामध्ये आणलेल्या बजेटच्या कागदपत्रांनी. या बस्त्यावर भारताचं राजकीय अशोक चक्र काढलेलं होतं आणि याची तुलना पारंपरिक भारतीय वहीखाता पद्धतीसोबत केली गेली होती. गेल्यावर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा अर्थमंत्र्यांनी लाल रंगाच्या बस्त्यात बजेटची कागदपत्र आणली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी