Budget 2020: शेअर बाजार गडगडला, मार्केटची सुरूवात घसरणीनं

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Feb 01, 2020 | 10:52 IST

आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता तो सादर करतील. दरम्यान शेअर बाजाराची सुरूवात घसरणीनं झाल्याचं पाहायला मिळाली. 

Share Market
Budget 2020: अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात घसरण  |  फोटो सौजन्य: ANI

 मुंबईः आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता तो सादर करतील.  मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करतील.  या अर्थसंकल्पातून करदात्यास मोठ्या अपेक्षा आहेत. करदात्यांना सूट म्हणून अंतरिम बजेटमध्ये कराची सूट जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री आज सकाळी 11 वाजता संसदेत 2020 चा अर्थसंकल्प सादर करतील. सध्याची मंदीचं सावट पाहता सरकार विविध क्षेत्रांसाठी काय घोषणा करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.  दरम्यान शेअर बाजाराची सुरूवात घसरणीनं झाल्याचं पाहायला मिळाली. 

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 140 अंकांनी कोसळला असून निफ्टीची 126.50 अंकांची घसरण झाली आहे.  शेअर बाजार सुरू होताच निर्देशांकात 150 अंकांची घरसण झाली. निफ्टी 50 अंकांनी घसरला होता. प्री ओपनिंगला सेन्सेक्सने 600 अंकांची घसरण झाली होती. तर सध्या बाजार स्ठिर आहे.

आज सकाळी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा  बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (सेन्सेक्स) 140 अंकांनी कोसळला आणि 40,576 वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी) 126.50 अंकांनी कोसळला आणि 11,910 वर स्थिरावल्याचा पाहायला मिळाला.

सध्या एचयूएल, आयटीसी, मारुती, ओएनजीसी, एलअँडटी, एशियन पेंट्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे शेअर तेजीत आहे. सन फार्मा, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी