केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बुधवारी (1 फेब्रुवारी 2023) अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी विविध सेक्टर्ससाठी अनेक घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये रेल्वेचाही समावेश आहे. केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष 2023-24 साठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. (Budget 2023 finance minister nirmala sitharaman announce more than 2 lakh crore for railway projects read in marathi)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यंदाच्या बजेटमध्ये रेल्वे सेक्टरसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वेसाठी 1.4 लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. तर 2013 च्या तुलनेत यंदाचा निधी हा तब्बल 9 पट अधिक आहे.
हे पण वाचा : लाल पेरू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, अनेक समस्या होतील दूर
चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच सिंगल आर्क रेल्वे पूल बांधण्यात येत आहे. चिनाब नदी रेल्वे ब्रिज हा उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल लिंक योजनेचा एक भाग आहे. 9.2 कोटी डॉलर्सचं बजेट असलेली 1.3 किलोमीटर लांब ही योजना काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारतासोबत जोडणार आहे.
हे पण वाचा : गर्भधारणेबाबतचे सत्य आणि अफवा
दिल्ली ते मेरठ या दरम्यान 2025 मध्ये रॅपिड ट्रेन चालवली जाणार आहे. हा रेल्वे कॉरिडोर तीन विभागात पूर्ण केला जाणार आहे. त्याचा पहिला भाग साहिबाबाद ते दुहाई डेपो या दरम्यान 17 किलोमीटर लांब आहे. मार्च 2023 पासून या विभागावरील रॅपिड ट्रेन मार्च 2023 पासून रेल्वे प्रवासासाठी सुरू केली जाणार आहे.
हे पण वाचा : तुम्ही पित असलेले दूध भेसळयुक्त तर नाही ना? असे तपासा
गुजरातमधील आठ जिल्ह्यांतून आणि दादरा-नगर हवेलीतून जाणाऱ्या या प्रकल्पाचं काम सुरू आहे. महाराष्ट्रातही या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प 2027 मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
हे पण वाचा : बकरीचे दूध प्या आणि लैंगिक क्षमता वाढवा
भालुकपोंग - तवांग लाईन हा ईशान्येकडील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे जो चीनसोबत तणाव वाढलेल्या भागातील लष्कराच्या व्यापक गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. या प्रस्तावित मार्गावर अनेक बोगदे असतील आणि 10000 फूट उंचीवर त्यांचे बांधकाम होईल.