Budget 2023 Highlights : बजेट 2023 मधील महत्त्वाचे मुद्दे, आव्हानांना सामोरा जात भारत प्रगती करत आहे : अर्थमंत्री

Budget 2023 Highlights in Marathi, Union Budget 2023 Highlights And Key Pointers PDF In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत बजेट 2023 सादर करत आहेत.

Budget 2023 Highlights
बजेट 2023 मधील महत्त्वाचे मुद्दे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Budget 2023 Highlights : बजेट 2023 मधील महत्त्वाचे मुद्दे
 • लोकसभेत बजेट 2023 सादर
 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले बजेट

Budget 2023 Highlights in Marathi, Union Budget 2023 Highlights And Key Pointers PDF In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत बजेट 2023 सादर करत आहेत. आव्हानांना सामोरा जात भारत प्रगती करत आहे, असे अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करताना म्हणाल्या. लोकसभेसाठी 2024 मध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधीचे मोदी सरकारचे हे शेवटचे फुल बजेट आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये निवडणुकीच्या आधी मोदी सरकार हंगामी बजेट सादर करेल. यामुळे या बजेटमधून अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. जाणून घ्या बजेट 2023 मधील महत्त्वाचे मुद्दे...

Modi सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, आता PM किसानमध्ये 6 नव्हे तर 8 हजार मिळणार

MPSC Recruitment 2023: MPSC कडून मेगाभरती; 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया, वाचा कोणत्या पदासाठी आणि वेतन किती

Union Budget 2023:नोकरदारासांठी आनंदाची बातमी; 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

 Income tax free : सात लाखपर्यंत उत्पन्नासाठी कर नाही
 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
 9 लाखासाठी 44 हजार कर
 15 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर 30 टक्के कर

काय स्वस्त होणार?

Union Budget 2023: What will be cheap and what will be expensive

 1. काही गोष्टींमधील कस्टम ड्युटीत कपात 
 2. इलेक्ट्रीक गाड्या स्वस्त होणार
 3. खेळणी, सायकल स्वस्त होणार
 4. LED TV, मोबाईल फोनही स्वस्त होणार
 5. विदेशी किचन चिमण्या महागणार
 6. एलईडी टीव्ही स्वस्त होणारचांदीची भांडीही महागणार
 7. कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

काय महाग होणार?

 1. विशिष्ट सिगरेट महागणार
 2. सिगारेटवर ड्युटी वाढवून 16 टक्के करणार
 3. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि या धातूंपासून तयार केलेले दागिने तसेच सर्व वस्तू महागणार

भारत जगातील 5 वी अर्थव्यवस्था

7 टक्के आर्थिक वृद्धीची अपेक्षा

मोफत अन्न योजनेसाीठी 2 लाख कोटी खर्च

रोजगार निर्मिती, युवा आणि आर्थिक स्थैर्यता हे तीन महत्त्वाचे मुद्दे

कोरोना काळातही अर्थव्यवस्था मजबूत

पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरूवात होणार

मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा, 2 लाख कोटींचा खर्च

पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरूवात होणार

मोफत अन्न योजनेसाीठी 2 लाख कोटी खर्च

9 वर्षात अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर

पीपीपी मॉडेल अंतर्गत पर्यटनाला चालना देणार

कृषी क्षेत्राचा डिजीटल विकासावर भर

शेतकऱ्यांना डिजीटल ट्रेनिंग देणार

अॅग्रो स्टार्टअपसाठी सरकार फंडिग देणार

पायाभूत सुविधासाठी कॅपेक्स 33 टक्के वाढवून 10 लाख कोटी

शेतकऱ्यांना कर्जावरील सूट सुरूच राहणार

स्टार्टअपसाठी कृषीनिधी वाढविण्यात येणार

अॅग्री स्टोरेजसाठी डी-सेंट्रलाइज सिस्टीम बनविणार

मच्छीपालनासाठी 6 हजार कोटींचा निधी, रोजगार तयार करण्यावर सरकारचा भर, 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करणार, कृषी क्षेत्रात कोल्ड स्टोरेजची संख्य़ा वाढविणार

शेतकऱ्यांना डिजीटल ट्रेनिंग देणार

कृषी क्षेत्राचा डिजीटल विकासावर भर

डाळींसाठी विशेष हब तयार करणार

कृषी कर्ज 20 लाख कोटींपर्यंत वाढविण्यात येणार

2047 पर्यंत अॅनिमिया संपविणार

वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणार

मेडिकल साहित्याचे उद्योग वाढविणार

नॅशनल डिजीटल लायब्ररी सुरू करण्यात येणार

मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज उघडणार

औषध संशोधन क्षेत्रासाठी नव्या योजना

अनुसूचित जातींसाठी 15 हजार कोटींची तरतूद

साक्षरतेसाठी एनजीओंना सोबत घेऊन काम करणार, एकलव्य शाळांमध्ये 38 हजार 800 शिक्षकांची नियुक्ती करणार

रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद
रेल्वेचा नफा 9 टक्क्यांनी वाढला
50 नवीन विमानतळ उभारणार
रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटींची तरतूद,रेल्वेला आतापर्यंतची सर्वाधिक मदत
ट्रान्सपोर्टच्या इन्फ्रासाठी 75 हजार कोटींची तरतूद
11.7 कोटी कुटुंबासाठी शौचालये बांधली
महापालिका स्वतःचे बॉन्ड आणू शकणार
शहरी विकासाठी वर्षाला 10 हजार कोटींचा खर्च
कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार भरपाई
KYC प्रक्रिया अधिक सुलभ करणार
कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचा सरकारचा प्रयत्न
हायट्रोजन मिशनसाठी 19 हजार 700 कोटी देणार
अक्षय उर्जेसाठी 20 हजार 700 कोटींची तरतूद
देशात 200 बायोगॅस प्लांट उभारणार
पंतप्रधान कौशल्य विकास योजना 3 वर्षांपर्यंत राबविणार
युवकांना ट्रेनिंगसाठी 30 स्किल इंडिया सेंटर उभारणार
ग्रीन लोन योजना राबविणार
5जी सर्व्हिससाठी 100 रिसर्च लॅब उभारणार

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणार
पर्यटनासाठी स्वदेश दर्शन योजना
एक जिल्हा एक उत्पादनासाठी मॉल बनविणार
राज्यांच्या राजधानीत युनीट मॉल उभारणार
महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा
राष्ट्रीय वित्तीय रणनितीने वित्तीय सुधारणा होणार

ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीसाठी नवीन योजना, 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत क्षमता वाढली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी