New Income Tax Slabs and Rates and tax calculation read in Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत बजेट 2023 सादर केले. या बजेटद्वारे मोदी सरकारने पगारदार मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याचे जाहीर केले. तसेच अर्थमंत्र्यांनी नव्या करप्रणालीत अडीच लाखांऐवजी 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त केले आहे.
नव्या करप्रणालीनुसार 3 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल आणि गुंतवणूक केली तर आणखी कमाल 4 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल. या पद्धतीने नव्या करप्रणालीनुसार गुंतवणूक केल्यास 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल.
जुन्या करप्रणाली अंतर्गत कर स्लॅब आणि दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही
कसा लागू होतो इन्कम टॅक्स | 5 लाखांवर झिरो टॅक्स | आता 7 लाखांवर झिरो टॅक्स |
वार्षिक उत्पन्न | 6.50 लाख | 7.0 लाख |
80 सी अंतर्गत सूट | 1.50 लाख | 1.50 लाख |
आयकरपात्र उत्पन्न | 5. लाख | 5.5 लाख |
टॅक्स | 5 टक्के | 5 टक्के |
टॅक्स स्लॅब | 2.5 लाखांपर्यंत शून्य टॅक्स | 3 लाखांपर्यंत शून्य टॅक्स |
आयकरपात्र उत्पन्नावर कर | 12,500 रुपये | 12,500 रुपये |
सेक्शन 87 (A) अंतर्गत रिबेट | 12,500 रुपये | 12,500 रुपये |
नेट टॅक्स | 0 | 0 |