Union Budget 2023 Marathi: इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक वस्तू महागणार अन् सोने स्वस्त होणार? वाचा काय होणार स्वस्त अन् महाग

Union Budget 2023 expectations: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर कोणत्या वस्तू महाग होणार आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. एक नजर टाकुयात कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. 

budget 2023 these non essential items expected to costlier jewellery electronic items likely to cheaper
Budget 2023: बजेटनंतर काय होणार स्वस्त अन् काय होणार महाग? वाचा सर्व सामानांची लिस्ट एका क्लिकवर 

Union Budget 2023 what products costlier and what will cheaper: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी (1 फेब्रुवारी 2023) संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. तसेच कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जाणून घेऊयात, कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

या आर्थिक वर्षात नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार हे अर्थसंकल्प सादर झाल्यावरच कळेल. मात्र, त्यापूर्वी या संदर्भातील काही अंदाज वर्तवण्यात येत ज्यानुसार, बजेटमध्ये काय होऊ शकते. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विविध मंत्रालयांनी आपल्या शिफारसी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला पाठवल्या आहेत. या शिफारशींवरुन कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग होऊ शकतात याचा अंदाज वर्तवता येतो.

हे पण वाचा : लाल पेरू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, अनेक समस्या होतील दूर

What products likely to costly: कोणत्या वस्तू महागण्याची शक्यता?

या आर्थिक वर्षात अनेक अनावश्यक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.  बजेट 2023 मध्ये इंपोर्ट ड्युटी वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, 35 हून अधिक वस्तूंच्या आयात करण्यावर टॅक्स वाढवला जाऊ शकतो. सरकारने वेगवेगळ्या मंत्रालयांच्या शिफारशींनुसार एक लिस्ट तयार केली आहे. ज्या वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी टॅक्स वाढवला जाऊ शकतो त्यामध्ये खासगी जेट, हेलिकॉप्टर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, ज्वेलरी, हाय ग्लॉस पेपर, स्टिल प्रोडक्ट्स, लेदर आणि व्हिटॅमिन्स यांचा समावेश आहे.

हे पण वाचा : गर्भधारणेबाबतचे सत्य आणि अफवा

यामुळे आत्मनिर्भर भारताच्या मिशनला एक बळ मिळेल. केंद्र सरकारने गेल्या वर्षी सादर केलेल्या बजेटमध्येही अनेक वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. इम्पोर्ट ड्युटी वाढवणे हा केंद्र सरकारचा लॉन्ग टर्म योजनेचा एक भाग आहे.

हे पण वाचा : तुम्ही पित असलेले दूध भेसळयुक्त तर नाही ना? असे तपासा

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बजेट सादर झाल्यावर त्याचा परिणाम दैनंदिन खर्चावर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होईल का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी इमिटेशन ज्वेलरी, छत्री आण एअरफोन यासारख्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवला जाण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : बकरीचे दूध प्या आणि लैंगिक क्षमता वाढवा

सोनं होणार स्वस्त?

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय रत्न, दागिने सेक्टरसाठी सोन्यासह इतक वस्तूंवरील आयात शुल्क कर कमी करू शकते. देशात ज्वेलरी आणि इतर फिनिश प्रोडक्ट्सची निर्यात वाढवण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 12.5 टक्के आणि 2.5 टक्के कृषी उपकर सह 15 टक्के केला होता. यामुळे ज्वेलरी उद्योगाला फटका बसला. पण या अर्थसंकल्पात त्यांना दिलासा मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी