Budget 2023: इलेक्ट्रिक गाड्या, मोबाइल, एलईडी TV स्वस्त होणार तर सिगारेट, सोने-चांदी महागणार; वाचा काय स्वस्त, काय महाग

Budget 2023, what costlier and what cheaper: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. जाणून घ्या आता काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे.

Budget 2023 which product costlier and what cheaper read full details in marathi
Budget 2023: इलेक्टिक गाड्या, मोबाइल, एलईडी TV स्वस्त होणार तर सिगारेट, सोने-चांदी महागणार; वाचा काय स्वस्त काय महाग 
थोडं पण कामाचं
 • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर
 • जाणून घ्या काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार

Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तसेच काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत.

इलेक्ट्रिक गाड्या, परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल, कॅमेरा लेन्स, मोबाइल फोन्स, एलईडी टीव्ही, लिथियम आयर्न, बायोगॅस संबंधीत उपकरणे स्वस्त होणार आहेत.

Electric vehicles will be cheaper इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार

सरकारने इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीवरील कस्टम ड्युटी हटवली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती कमी होणार आहेत.

हे पण वाचा : लाल पेरू आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, अनेक समस्या होतील दूर

Custom duty on cigarettes increased सिगारेट महागणार 

सिगारेटवर इम्पोर्ट ड्युटी वाढवून 16 टक्के करण्यात आला आहे. याच्यासोबतच आयात करण्यात येणाऱ्या सिगारेट महाग होणार आहेत.

हे पण वाचा : गर्भधारणेबाबतचे सत्य आणि अफवा

काय झाले स्वस्त (What gets cheaper)

काय झाले महाग (What gets costlier)

इलेक्ट्रिक गाड्या विदेशी किचन चिमण्या
परदेशातून आयात होणारी खेळणी चांदीचे दागिने
सायकल चांदीची भांडी
कॅमेरा लेन्स सिगारेट
मोबाइल फोन्स सोने, चांदी, प्लॅटिनम
एलईडी टीव्ही छत्री
लिथियम आयर्न  
बायोगॅस संबंधी उपकरणे  

काय स्वस्त होणार ?

 1. इलेक्ट्रीक गाड्या स्वस्त होणार
 2. खेळणी, सायकल स्वस्त होणार
 3. मोबाईल फोनही स्वस्त होणार
 4. कॅमेरा लेन्स स्वस्त होणार
 5. मोबाईल फोन आणि टीव्ही स्वस्त होणार

हे पण वाचा : तुम्ही पित असलेले दूध भेसळयुक्त तर नाही ना? असे तपासा

काय महागणार?

 1. विदेशी किचन चिमण्या महागणार
 2. चांदीचे दागिने महाग होणार
 3. चांदीची भांडीही महागणार
 4. सिगारेट महागणार
 5. सोने, चांदी, प्लॅटिनम महागणार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी