Business Idea in marathi: लय भारी आहे बिझनेस; फक्त करा 5 लाखांची गुंतवणूक अन् कमवा महिना 2 लाख रुपये

काम-धंदा
भरत जाधव
Updated Feb 24, 2023 | 10:37 IST

Business Ideas in marathi: ज्या लोकांना नोकरी करण्याची इच्छा नाही किंवा नोकरी सोबत काहीतरी जोडव्यवसाय असावा असे वाटेल तर ऑटो सेक्टर संबंधित व्यवसाय (Business)  करा. कारण या व्यवसायात उत्पन्न अधिक असून गुंतवणूक कमी पैशांची आहे. हा बिझनेस आहे कार अ‍ॅक्सेसरीजचा.

Business Idea: Just invest 5 lakhs and earn 2 lakhs per month,know the details
सुपर बिझनेस आयडिया; लाखात होईल महिन्याची कमाई   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अ‍ॅक्सेसरीजच्या व्यवसायात कमाई बाजाराच्या स्थितीवर देखील अवलंबून असते.
  • हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे.
  • कार अ‍ॅक्सेसरीजच्या व्यवसायातील मार्जिन 35 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत आहे.

Business Ideas in marathi : नवी दिल्ली:ऑटोमोबाईल (Automobile)मार्केट ( market) हे वाढत आहे. कार माणसांची गरज बनू लागली आहे. ऑटो सेक्टरच्या या प्रगतीबरोबर त्याच्याशी संबंधीत काही व्यवसायदेखील वाढू लागले आहेत. ज्या लोकांना नोकरी करण्याची इच्छा नाही किंवा नोकरी सोबत काहीतरी जोडव्यवसाय असावा असे वाटेल तर ऑटो सेक्टर संबंधित व्यवसाय (Business)  करा. कारण या व्यवसायात उत्पन्न अधिक असून गुंतवणूक कमी पैशांची आहे. हा बिझनेस आहे कार अ‍ॅक्सेसरीजचा (car accessories). (Business Idea: Just invest 5 lakhs and earn 2 lakhs per month,know the details)

अधिक वाचा  : घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स
हे पारंपारिक व्यवसाय श्रेणीमध्ये येते. बर्‍याच वेळा लोक याला हंगामी व्यवसाय मानतात पण तसे नाही. वर्षातील 365 दिवस कार अ‍ॅक्सेसरीजची मागणी असते.  जवळजवळ प्रत्येक कार खरेदीदार कार घेतल्यानंतर दोन ठिकाणी जातो. यापैकी पहिले स्थान हे मंदिर आणि दुसरे स्थान कार अ‍ॅक्सेसरीजचे दुकान. दरम्यान या व्यवसायात उत्पन्न जास्त असल्याने हिशोब व्यावसायिकपणे सांभाळावी लागतात नाहीतर आपल्याला नफा दिसत नाही. या व्यवसायातील नफा बघता या कामातील मेहनत कमी वाटते. आजकाल कार अ‍ॅक्सेसरीज ऑनलाइन उपलब्ध आहेत, परंतु तरीही 90 टक्के लोक ते पाहिल्यानंतर आणि तपासल्यानंतरच त्यांना त्यांच्या कारमध्ये बसवण्यास प्राधान्य देतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च किती होईल आणि नफ्याची टक्केवारी किती आहे ते आपण जाणून घेऊ.. 

अधिक वाचा  : IRCTC, PNR चा फुल फॉर्म माहितीये का?

  • हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 300 ते 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. दुकान असेल तर उत्तम. 
  • या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीची गरज नाही. 
  •  हा व्यवसाय पूर्णपणे तोंडी प्रसिद्धी मिळवून देणारा आहे. तसेच तुमच्या दुकानाच्या स्थानावर अवलंबून आहे.
  • जर दुकाना चांगल्या महत्त्वाच्या ठिकाणी असलं तर तुमचा व्यवसाय वाढेल.  म्हणूनच नेहमी कार मार्केटच्या आजूबाजूची दुकाने शोधा.
  • यानंतर तुम्हाला मालाची गरज आहे. तुम्ही माल दोन प्रकारे घेऊ शकता, पहिला मार्ग म्हणजे घाऊक विक्रेत्यांकडून माल खरेदी करणे, परंतु यामध्ये तुमचे मार्जिन काही प्रमाणात संपत असते. 
  • दुसरा चांगला मार्ग म्हणजे थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करणे. जवळजवळ सर्व अ‍ॅक्सेसरीज उत्पादक त्यांच्या वस्तू मोठ्या प्रमाणात ऑनलाइन विकत असतात.
  • तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क करून वस्तू मागवू शकता. यामध्ये तुमचे मार्जिन चांगले राहील, तसेच उत्पादक तुम्हाला 30 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंत क्रेडिटही देतो.
  • आणखी एक मोठा फायदा म्हणजे काही मोठे उत्पादकही माल विकला गेला नाही किंवा खराब झाल्यास तो परत घेतात.
  • यानंतर तुम्हाला 4 ते 5 कामगार लोकांची गरज आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, डेंटर, फिटर आणि हेल्पर यांचा समावेश आहे.

कुठे होईल खर्च 

अधिक वाचा  : Made In India: भारतातील पहिली कार कोणती माहितीये का?

  • कार अ‍ॅक्सेसरीजचा व्यवसाय सुरू करताना, तुम्हाला सर्वात मोठा खर्च हा दुकान खरेदी करण्यावर होत असतो. तुम्ही हे दुकान कोणत्याही ऑटो मार्केटजवळ घेतल्यास तुम्हाला दरमहा एक लाख रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागेल. 
  • दुसरा मोठा खर्च तुमच्या पगारामुळे होत असतो. इलेक्ट्रिशियनचा पगार 25 हजार ते 30 हजार, तर एका डेटरला 20 ते 25 हजार रुपये लागतात, तरीही जवळपास तेवढेच आणि मदतनीस महिन्याला 10 ते 15 हजार रुपये पगार घेत असतात.
  • उर्वरित खर्च हा दुकानात माल भरण्यासाठी केला जातो. गुंतवणुक केल्यानंतर तुमच्याकडे अतिरिक्त एक लाख रुपये असावेत. कारण व्यवसाय कमी झाला असेल किंवा ग्राहक कमी असतील तर कामगारांना पगार देण्यासाठी हा पैसा कामी येत असतो. 

किती आहे कमाई 

कार अ‍ॅक्सेसरीजची बाजारपेठ थोडी वेगळी आहे. इथे जवळपास कोणत्याही उत्पादनाची MRPठरवलेली नाही.  दरम्यान बाजारपेठ पाहून वस्तूंची आणि उपकरणांची किंमत ठरवली जाते. एका अंदाजानुसार, कार अ‍ॅक्सेसरीजच्या व्यवसायातील मार्जिन 35 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपये कमवू शकता.  ही कमाई बाजाराच्या स्थितीवर देखील अवलंबून असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी