SBI देणार १ ऑक्टोबरला गृहकर्ज संबंधी मोठी खुशखबर 

काम-धंदा
Updated Sep 24, 2019 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

SBI Loan:  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व फ्लोटिंग लोनला रेपो रेटशी जोडले आहे. त्यामुळे सर्व कर्जांचे नवे दर १ ऑक्टोबर २०१९ पासून बदलणार आहेत. काय फायदा होणार जाणून घ्या 

business news in marathi sbi with cut loan interest rate from 1 oct 2019 google batmya
SBI ने सर्व फ्लोटिंग लोन रेपो रेटशी केले लिंक, १ ऑक्टोबरपासून होणार कमी होम लोनचे दर  

थोडं पण कामाचं

  • SBI ने सर्व फ्लोटिंग लोन रेपो रेटशी केले लिंक, १ ऑक्टोबरपासून होणार कमी होम लोनचे दर 
  • लघु आणि मध्यम उद्योग कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि किरकोळ कर्जावर एक ऑक्टोबरपासून व्याज दर हे रेपो रेटशी जोडले जाणार
  • भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने चार सप्टेंबरला दिले होते सर्व बँकांना निर्देश

मुंबई :  भारतीय स्टेट बँक ( SBI)ने आपल्या लघु आणि मध्यम उद्योग कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि किरकोळ कर्जावर एक ऑक्टोबरपासून व्याज दर हे रेपो रेटशी आधारीत करून वसूल करणार आहे. बँकने सोमवारी याची घोषणा केली आहे. या अंतर्गत सर्व फ्लोटिंग (परिवर्तनीय) व्याज दराच्या कर्जासाठी मापदंड हा रेपो रेट मानणार आहे. 

भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने चार सप्टेंबरला सर्व बँकांना सांगितले की, आपले परिवर्तनीय व्याज दरांच्या कर्जांचे व्याज दर रेपो रेटशी जोडले पाहिजे. एसबीआयने एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले की, सर्व परिवर्तनीय व्याज दरच्या कर्जासाठी आम्ही व्याज दर हे रेपो रेट नुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. लघु आणि मध्यम उद्योग कर्ज, गृह कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज यामुळे १ ऑक्टोबर पासून रेपो रेटनुसार लागू होणार आहेत. 

ग्राहकांचा होणार फायदा 

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने सध्याच्या आर्थिक वर्षात एकूण चार वेळा रेपो रेटमध्ये कपात केली. रेपो रेटमध्ये एकूण १.१ टक्के कपात करण्यात आली. त्यामुळे रेपो रेट हा ५.४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पण तरीही सरकारी बँकानी आपल्या कर्जाच्या दरात कोणताही कपात केलेली नव्हती. त्यानंतर रिझर्व बँकेने सरकारी बँकांना निर्देश देत आपले व्याज दर हे रेपो रेटशी सुसंगंत करण्यास सांगितले. त्यामुळे सध्या असलेल्या व्याज दरात किमान .१५ टक्क्यांचा फरक पडण्याची शक्यता आहे.  सध्या स्टेट बँकेचे ३० लाखांसाठी गृहकर्जासाठी महिलांना ८.२५ टक्के व्याज दर आहे. तो ८.१० टक्के होण्याची शक्यता आहे. तर इतरांना ८..३० टक्के व्याज दर आहे तो आज ८.१५ टक्के होण्याची शक्यता आहे. 

तसेच भविष्यात रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास बँकांना गृहकर्जाच्या किंवा इतर कर्जांच्या व्याज दरात वाढ करण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे सध्या तरी नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी फायदा होणार आहे. तसेच ज्यांनी फोल्टिंग व्याज दराचा पर्याय निवडला असेल अशा जुन्या ग्राहकांनांही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी