फक्त १५ हजारात सुरू करा बिझनेस, सरकार देईल ९० टक्के कर्ज, करा लाखोंची कमाई

Business Opportunity:तुम्ही गावात किंवा शहरात, कुठेही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाला दिवसेंदिवस मागणी वाढते आहे. कमी भांडवलातून उत्तम कमाईची संधी या व्यवसायात आहे.

Business Opportunity of Sanitary Napkin
सॅनिटरी नॅपकिनचा बिझनेस 

थोडं पण कामाचं

  • सॅनिटरी नॅपिकन उत्पादनाचे युनिट
  • केंद्र सरकारची मुद्रा लोन योजना
  • कसा सुरू करायचा व्यवसाय

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या (Corona pandemic) संकटाने लाखो नागरिकांचे उदरनिर्वाहचे साधन (unemployment) हिरावून घेतले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांच्या व्यवसायांवर-धंद्यांवर संकट (business crisis) कोसळले आहे. नोकऱ्या उपलब्ध नाहीत, व्यवसाय सुरू करायचा तर मोठे भांडवल हवे अशा संकटाच्या परिस्थितीत तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल तर तुम्ही एक सोपा आणि नेटका व्यवसाय (easy business) सुरू करू शकता. यात भांडवल अतिशय कमी (less capital investment) लागते आणि नियमित उत्पन्न (regular income from business) मिळू शकते. शिवाय यासाठी सरकारची मदतदेखील (government help for business) मिळते. या व्यवसायाला दिवसेंदिवस मागणी (growing business) वाढते आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त जागेचीही आवश्यकता नसते. तुम्ही एका छोट्याशा खोलीत हा व्यवसाय किंवा धंदा सुरू (Business Opportunity) करू शकता. हा व्यवसाय आहे सॅनटरी नॅपकिनचा (Sanitary Napkin Unit). तो कसा सुरू करायचा (How to start business of sanitary pads), कोणती मदत मिळते, या सर्व बाबी विस्ताराने समजून घेऊया. ( Start your business with just Rs 15,000 with 90 percent loan from government, earn handsome money)

सॅनिटरी नॅपिकन उत्पादनाचे युनिट (Sanitary Napkin Unit)

नाममात्र भांडवलात आणि छोट्याशा जागेत सुरू करायचा हा व्यवसाय आहे सॅनिटरी नॅपकिनचे युनिट सुरू करण्याचा. यासाठी जास्त खर्च येत नाही. सॅनिटरी नॅपकिनचे युनिट सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त १५,००० रुपये टाकावे लागतील. उर्वरित सर्व रक्कम सरकार तुम्हाला मुद्रा लोनच्या योजनेमार्फत (Mudra Loan Scheme) उपलब्ध करून देते. पहिल्याच वर्षी या व्यवसायातून तुम्ही एक ते सव्वा लाख रुपयांची कमाई करू शकता. अर्थात ही रक्कम किमान रक्कम आहे. तुम्ही जर अधिक गुंतवणूक केली आणि व्यवसाय चांगला चालवला तर याहून कितीधरी अधिक कमाई तुम्ही करू शकता. शिवाय ही फक्त व्यवसाय सुरू केल्यानंतरची पहिल्या वर्षाचीच कमाई आहे. पुढील वर्षापासून तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होत जाईल, नफाही वाढत जाईल.

कसा सुरू करायचा व्यवसाय

सरकारने सॅनिटरी नॅपकिनच्या व्यवसायाचा एक प्रोजेक्ट तयार केला आहे. जर तुम्हाला सॅनिटरी नॅपकिनचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फक्त १६ x१६ चौ.फूटच्या खोलीत हे सॅनिटरी नॅपकिनचे युनिट सुरू करू शकता. दररोज १८० पॅकेट उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्या युनिटसाठी १.४५ लाख रुपये इतका खर्च येतो. यातील ९० टक्के म्हणजेच १.३० लाख रुपयांची रक्कम सरकार तुम्हाला मुद्रा लोनमार्फत उपलब्ध करून देते.
याबाबात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सॅनिटरी नॅपकिनच्या युनिटसाठी सॉफ्ट टन सिलिंग मशीन, नॅपकिन कोर डाय, यूव्ही ट्रिट युनिट, डिफायबरेशन मशीन, कोर मॉर्निंग मशीन तुम्हाला लावावी लागते. या सर्वांवर ७०,००० रुपयांपर्यत खर्च येतो. मशीन विकत घेतल्यानंतर कच्चा माल विकत घ्यावा लागेल. यात वुड पल्प, टॉप लेयर, बॅक लेयर, रिलीज पेपर, गम, पॅकिंग कव्हर यांची आवश्यकता भासेल. कच्च्या मालासाठी तुम्हाला जवळपास ३६,००० रुपयांचा खर्च येईल.

किती कमाई होते

एका वर्षात जर तुमचे युनिट ३०० दिवस सुरू राहिले तर जवळपास ५४,००० सॅनिटरी नॅपकिन पॅकेटचे उत्पादन तुम्ही करू शकाल. या सॅनिटरी नॅपकिन पॅकेटच्या उत्पादनासाठी तुम्हाला जवळपास ५,९०,००० रुपयांचा खर्च येईल. साधारणपणे सॅनिटरी नॅपकिनच्या एका पॅकेटची घाऊक बाजारात १३ रुपयांना विक्री झाली तर तुमची एकूण विक्री ७ लाख रुपयांची होईल. अशा परिस्थितीत तुमचा निव्वळ नफा  १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी