दागिन्यांपेक्षा खरेदी करा सोने-चांदीचे नाणे, होईल प्रचंड फायदा 

काम-धंदा
Updated Nov 14, 2019 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याऐवजी आपण नाणी खरेदी केल्यास त्याचा आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. जाणून घ्या नेमका काय असेल फायदा.

buy gold and silver coins over jewelry will be a huge benefit
दागिन्यांपेक्षा खरेदी करा सोने-चांदीचे नाणे, होईल प्रचंड फायदा   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • सोन्याचे दागिने खरेदी करण्यापेक्षा नाणी खरेदी करणं ठरतं फायदेशीर
  • सोन्याची नाणी खरेदी केल्यास मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही
  • सोन्याच्या नाण्यांवर कोणतीही घट नसते

मुंबई: अनेक शुभ मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी करणं हे आपल्याकडे शुभ मानलं जातं. दिवाळी, दसरा, अक्षय्य तृतीया यासारख्या मुहू्र्तांवर तर हमखास सोने खरेदी केली जाते. पण अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की, अशावेळी सोन्याचे दागिने खरेदी करायचे की नाणी? 

सणांच्या वेळी काही ऑफर्स आपल्याला प्रचंड भुरळ घालतात आणि दागिन्यांचे आकर्षक डिझाइन पाहून असं वाटतं की, हीच 'राइट चॉईस' आहे. पण यावेळी जर आपण थोडा विचार केल्यास लक्षात येईल की, दागिन्यांपेक्षा नाणी खरेदी करणं हे फायदेशीर आहे. 

पाहा सोने आणि चांदीची नाणी खरेदी करणं कसं ठरु शकतं फायदेशीर: 

  1. मेंकिग चार्ज: जेव्हा आपण सोन्याचे दागिने खरेदी करतात तेव्हा तुम्हाला मेकिंग चार्ज (घडणावळ) द्यावे लागतात. पण जेव्हा आपण तेच दागिने विकण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी जातात तेव्हा आपल्याला ती किंमत मिळत नाही. त्यामुळे मेकिंग चार्जच्या ओझ्यापासून वाचायचं असेल तर सोन्याची नाणी घेणं हे कधीही फायदेशीर ठरतं. यामुळे सणांची खरेदी करताना आपल्याकडे अधिक पैसे शिल्लक राहतील. 
  2. कधीही नाण्यांपासून बनवा दागिने: जर आपण सोन्याचे दागिने हे शिक्के किंवा बिस्किटांपासून जर बनवित असाल तर हे दागिने आपल्याला मेकिंग चार्ज ऐवजी फक्त सोन्याची मूळ किंमती मिळतील. त्यामुळे जर आपल्याकडे सोन्याची नाणी असतील तर आपण कोणत्याही नुकसानाशिवाय कधीही सोन्याचे दागिने बनवू शकता. 
  3. गुतंवणुकीचा फायदेशीर व्यवहार: गुंतवणुकीचा अर्थ असा होतो की, नफ्यासाठी पैशाची गुंतवणूक करणं. जेव्हा आपण दागिन्यांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा आपण आपल्याला ते विकताना मेकिंग चार्जचं नुकसान सोसावं लागतं. पण जर आपण सोन्याची नाणी खरेदी करुन गुंतवणूक केली तर भविष्यात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर आपण ही नाणी विकून आपल्याला कोणत्याही नुकसानाशिवाय त्या नाण्यांची जास्त किंमत मिळू शकते. 
  4. सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर: आपल्याला अनेक घटना पाहायला मिळतात की, साखळी चोरांकडून सोन्याचे दागिने खेचून चोरले जातात. अशावेळी दागिने घालून बाहेर जाणं हे काहीसं धोकादायक झालं आहे. पण जर आपण सोन्याची नाणी खरेदी करुन ते सेफ लॉकरमध्ये ठेवलं तर चोरीला जाण्याचा संभव कमी असतो. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी