आर्यनकडून वाईट कृत्यांची अपेक्षा बाळगणाऱ्या शाहरूखला 'बायजू'चा दणका

माझ्या मुलाने सर्व वाईट गोष्टी कराव्या; अशा स्वरुपाची अपेक्षा मुलाखतीच्या माध्यमातून बॉलिवूड किंग शाहरूख खान याने जाहीर केली होती. ही विचित्र 'मन्नत' बाळगणाऱ्या शाहरूख पहिला मोठा दणका मिळाला.

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
आर्यनकडून वाईट कृत्यांची अपेक्षा बाळगणाऱ्या शाहरूखला 'बायजू'चा दणका 

थोडं पण कामाचं

  • आर्यनकडून वाईट कृत्यांची अपेक्षा बाळगणाऱ्या शाहरूखला 'बायजू'चा दणका
  • 'बायजू'ने शाहरूखला घेऊन तयार केलेल्या जाहिराती दाखवणे बंद केले
  • आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबईः माझ्या मुलाने सर्व वाईट गोष्टी कराव्या; अशा स्वरुपाची अपेक्षा मुलाखतीच्या माध्यमातून बॉलिवूड किंग शाहरूख खान याने जाहीर केली होती. ही विचित्र 'मन्नत' बाळगणाऱ्या शाहरूख पहिला मोठा दणका मिळाला. आर्यनकडून वाईट कृत्यांची अपेक्षा बाळगणाऱ्या शाहरूखला 'बायजू'ने दणका दिला. लर्निंग अॅप 'बायजू'ने शाहरूखला घेऊन तयार केलेल्या जाहिराती दाखवणे बंद केले आहे. ज्या जाहिरातींमध्ये शाहरूख दिसतो त्या जाहिराती दाखवणे थांबवण्याचा निर्णय 'बायजू'च्या अॅड टेक चीफने घेतला आहे. Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest

आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यन तसेच ड्रग पार्टी केसमध्ये न्यायालयीन कोठडी झालेल्या इतर आरोपींची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये झाली. जेलच्या कोविड प्रोटोकॉलनुसार आरोपींना जेलमध्ये क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर आरोपींना इतर कच्च्या कैद्यांसोबत (ज्यांची कोर्ट केस सुरू आहे असे कैदी) ठेवले जाईल. 

आर्यन खान हा बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा मुलगा आहे. यामुळे अनेकांचे त्याच्याशी संबंधित कोर्ट केसकडे लक्ष आहे. या घडामोडींचा आपल्या ब्रँडवर कळत नकळत होणारा परिणाम लक्षात घेऊन लर्निंग अॅप 'बायजू'ने शाहरूखला घेऊन तयार केलेल्या जाहिराती दाखवणे बंद केले आहे.

ETच्या वृत्तानुसार लर्निंग अॅप 'बायजू' शाहरूखला जाहिरातीसाठी दरवर्षी ३ ते ४ कोटी रुपये मोजते. शाहरूख 'बायजू'साठी २०१७ पासून जाहिरात करत आहे. 'बायजू' अॅप ऑनलाइन लर्निंगसाठी भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या अॅप पैकी एक आहे. मागील काही वर्षांमध्ये 'बायजू'च्या लोकप्रियतेत आणि वापरात वाढ झाली. ब्रिक एंड मोर्टार कोचिंग इन्स्टिट्युट, आकाश इन्स्टिट्युट तसेच अन्य संस्थांसोबतच्या करारांमुळे 'बायजू' अॅपच्या व्यवसायाचा वेगाने विस्तार झाला. शाहरूखला घेऊन केलेल्या जाहिरातींमुळे कंपनीचा फायदा झाला. पण आर्यनला अटक झाल्यानंतर ब्रँडवर होणाऱ्या परिणामाचा विचार करुन लर्निंग अॅप 'बायजू'ने शाहरूखला घेऊन तयार केलेल्या जाहिराती दाखवणे बंद केले आहे.

एप्रिल २०२१ मध्ये लर्निंग अॅप 'बायजू'चे मूल्य १६.५ अब्ज डॉलर झाले. गुंतवणूकदारांच्या सहकार्याने 'बायजू' व्यवसाय विस्तारासाठी आणखी १.५ अब्ज डॉलरचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार 'बायजू'चे संस्थापक बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक मूल्य २४ हजार ३०० कोटी रुपये झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी