टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी ८२० कोटींचा निधी

Cabinet approves Rs 820 cr financial support for India Post Payments Bank : केंद्र सरकारने टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी (इंडिया पोस्ट बँक) ८२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली.

Cabinet approves Rs 820 cr financial support for India Post Payments Bank
टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी ८२० कोटींचा निधी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी ८२० कोटींचा निधी
  • सर्वाधिक फायदा ग्रामीण भागाला होणार
  • टपाल विभागाच्या बँकेत पाच कोटी बचत खाती

Cabinet approves Rs 820 cr financial support for India Post Payments Bank : नवी दिल्ली : केंद्र सरकारने टपाल विभागाच्या पेमेंट बँकेसाठी (इंडिया पोस्ट बँक) ८२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. इंडिया पोस्ट बँकेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक भाग जिथे अद्याप बँकेच्या सोयी पोहोचल्या नाहीत तिथेही बँकेच्या सेवा पोहोचणार आहेत. सर्वाधिक फायदा ग्रामीण भागाला होणार आहे. 

केंद्र सरकार इंडिया पोस्ट बँकेचे १०० टक्के डिजिटलायझेशन करण्याच्या कामाला वेग देणार आहे. यामुळे टपाल विभागाच्या कोणत्याही शाखेतून कोणत्याही खात्याशी संबंधित व्यवहार करणे सोपे होणार आहे. ऑनलाइन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग पद्धतीने इंडिया पोस्ट बँकेतील खात्यांचे व्यवहार हाताळण्याची सोय उपलब्धल करुन दिली जाणार आहे.

सध्या टपाल विभागाच्या बँकेत पाच कोटी बचत खाती आहेत. टपाल विभागाच्या १.३६ लाख शाखांमधून टपाल विभागाच्या बँकेचा कारभार हाताळला जात आहे. विशेष म्हणजे टपाल विभागाच्या बँकेतील ४८ टक्के खाती महिलांची आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी