लक्ष्मी विलास बँकेचं DBILमध्ये विलिनीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Lakshmi Vilas Bank: लक्ष्मी विलास बँक आणि डीबीआयएल यांच्या विलिनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Cabinet approves scheme of amalgamation of Lakshmi Vilas Bank with DBS Bank India Limited
लक्ष्मी विलास बँकेचं DBILमध्ये विलिनीकरण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता  |  फोटो सौजन्य: BCCL

लक्ष्मी विलास बँकेवर एका महिन्याचा मोरेटोरियल लावण्यात आला असून यामुळे ग्राहकांना बँकेतून आवश्यक कामासाठीच अधिकाधिक २५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष्मी विलास बँक (Laxmi Vilas Bank) आणि डीबीआयएल (DBS Bank India Limited) यांच्या विलिनीकरणाच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

लक्ष्मी विलास बँकेतील ग्राहकांचे हित लक्षात घेत तसेच बँकेला स्थिर ठेवण्यासाठी विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत रिझर्व्ह बँकेने सरकारसोबत सल्ला मसलत करुन लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन ठेवीदारांच्या हित जपण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. 

एटीसी टेलिकॉम कंपनीचे सुमारे १२% शेअर्स खरेदी करण्यासाठी एटीसी एशिया पॅसिफिकच्या २,४८० कोटी रुपयांच्या एफडीआय प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना बँकेतून रक्कम काढण्यासाठी असलेले निर्बंध शक्य तेवढ्या लवकर हटवण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्ष्मी विलास बँक आणि डीबीआयएल यांच्या विलिनिकरणाच्या निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यामुळे ग्राहकांना त्यांना आपल्या सेव्हिंग्स काढणे सोपे होईल. यासोबतच बँकेतून पैसे काढण्यावरील निर्बंधही हटवण्यात येणार आहेत.

सरकारने राष्ट्रीय पायाभूत प्रकल्पांच्या सीरिज कामांसाठी १११ लाख कोटी रुपयांच्या निधीला पाठिंबा देण्यासाठी पाऊलं उचलले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की, राष्ट्रीय पायाभूत सुविधांसाठी  २२,००० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी