Electric Vehicle : नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल असे काही बोलले की कार-बाइक चालवणारे झाले खूश...

Electric vehicle cost : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) किंमती पेट्रोल वाहनांइतक्याच झालेल्या असतील. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती (Electric vehicle cost)कमी होतील.

Electric vehicle cost
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती घटणार 
थोडं पण कामाचं
  • नितिन गडकरींनी सांगितले इलेक्ट्रिक वाहनांचे भवितव्य
  • कार चालक, बाइक चालक झाले खूश
  • भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्राची दिशा

Nitin Gadkari on Electric Vehicle : नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) किंमती पेट्रोल वाहनांइतक्याच झालेल्या असतील. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती (Electric vehicle cost)कमी होतील. म्हणजेच याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांइतकीच झालेली असेल. त्यातून क्रांती होऊ शकते, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. (Car, bike riders will get happy after Nitin Gadkari's explanation electric vehicles) 

अधिक वाचा : Types Of Savings Account : बचत खात्याचे किती प्रकार आहेत? तुमच्यासाठी कोणते सर्वोत्तम असेल, येथे समजून घ्या

प्रदूषणाची पातळी घटणार

नितीन गडकरी यांनी लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2022-23 साठीच्या अनुदानाच्या मागणीवर उत्तर देताना, सांगितले की प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याची गरज आहे, इलेक्ट्रिक इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल. प्रदूषण हे केवळ भारतासमोरच नाही तर जगभरात मोठे आव्हान आहे.

अधिक वाचा : e-PAN Card : आता तुम्ही 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड PDF करू शकता डाउनलोड, पाहा स्टेप बाय स्टेप पद्धत

केंद्रीय मंत्र्यांचा आग्रह

यासोबतच केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपापल्या भागातील सांडपाण्याचे पाणी ग्रीन हायड्रोजनमध्ये बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लवकरच हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल असेही त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, 'लिथियम आयन बॅटरीच्या किंमती झपाट्याने कमी होत आहेत. आम्ही झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित करत आहोत. जास्तीत जास्त दोन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.

अधिक वाचा : PPF Investment : पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा करा दुप्पट! टॅक्सही वाचवा आणि कमाईदेखील करा, पाहा या टिप्स...

जाणून घ्या खर्चात किती फरक पडेल

केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 'याचा फायदा असा होईल की जर तुम्ही आज पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवताना हा खर्च 10 रुपयांवर येईल.' काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन फ्युएल कार (Green Hydrogen Fuel Cell Car)लाँच केली होती. नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारचा खर्च प्रति किमी 1 रुपयापेक्षा कमी आहे, तर पेट्रोल कारचा खर्च 5-7 रुपये प्रति किमी आहे. त्यामुळे आता वाहन उत्पादक कंपन्यादेखील इलेक्ट्रिक वाहनांवरही काम करत आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या FCEV टोयोटा मिराई कारचा या पायलट प्रोजेक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रदूषणाच्या जबरदस्त समस्येवर इलेक्ट्रिक वाहनांमुळे तोडगा शोधता येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालकांसमोर इंधनाच्या खर्चाचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. अशात भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. सध्या सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी