आर्थिक संकटात कार विक्रीमध्ये होणार मोठी वाढ, जाणून घ्या कारण...

Car sales: लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापार, व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, लॉकडाऊन संपल्यावर कार विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 

car sale may increase after lockdown because people likely to avoid public transport for safety 
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊननंतर कार विक्रीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता 
  • ग्राहक ऑनलाईन खरेदी करणार कार 
  • नागरिकांसाठी आपली सुरक्षा महत्वाची 

नवी दिल्ली: कोविड-१९ च्या संकटानंतर नागरिक कार खरेदी ऑनलाईन माध्यमातून करण्याची शक्यता आहे. कन्सल्टन्सी कंपनी ईव्हायच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना महारोगराईमधून बाहेर पडल्यावर नागरिक शोरूममध्ये न जाता ऑनलाईन कार खरेदीला प्राधान्य देतील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कोविड-१९ नंतर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वत:च्या वाहनांचा वापर अधिक करतील. म्हणजेच नागरिक सार्वजनिक वाहतूकीचा वापर कमी आणि स्वत:च्या गाडीचा वापर अधिक करतील. यामुळे कार विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल. ईव्हाय कंपनीच्या मते, येत्या काळात वाहन क्षेत्रालाही नागरिकांच्या व्यवहारात होणाऱ्या बदलांशी जुळुन घ्यावे लागेल आणि त्याप्रमाणे आपल्या व्यवहारात बदल करावे लागतील.

ऑनलाईन खरेदीची मागणी वाढणार 

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, कोविड-१० संकटानंतर ग्राहक ऑनलाईन खरेदी करण्यावर भर तेतील यात शंका नाही. त्यामुळे वाहन खरेदी सुद्धा याच श्रेणीमध्ये येईल. सध्या भारतीय एखाद्या कारच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन सर्च करत आहेत. मात्र, जागरूकता आणि पर्याय याच्या अभावामुळे सध्या ऑनलाईन कार विक्री होत नाहीये.

वैयक्तिक वाहनांचा उपयोग वाढणार 

चीनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधणाचा उल्लेख देत रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, संसर्गाचा धोका लक्षात घेता आणि स्वच्छतेसाठी नागरिक स्वत:च्या वाहनांचा उपयोग करणं पसंती देत आहेत. कोविड-१९ संकटामुळे जो एक विशेष बदल घडला आहे तो म्हणजे नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळून आपल्या गाडीचा वापर अधिक करत आहेत.

सोशल डिस्टंसिंगमुळे विक्री वाढणार

रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे की, सध्या लॉकडाऊनमुळे कार विक्री बंद झाली आहे. मात्र, लॉकडाऊननंतर ऑनलाईन कार विक्री वाढण्याची शक्यता आहे. ईव्हाय इंडियाचे पार्टनर आणि वाहन क्षेत्राचे लीडर विनय रघुनाथ यांनी सांगितले की, कोविड-१९ नंतर नागरिक सोशल डिस्टंसिंगचं पाल करतील. नागरिक संपर्करहित खरेदी करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी