Career after 50: सध्याच्या काळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी (Economic Freedom) असणं सर्वांसाठीच गरजेचं असतं. मात्र काहीजण कुठल्या ना कुठल्या कारणाने चाळिशीतच (Fourty) आपल्या करिअरपासून (Career) वेगळे होतात. कधी कौटुंबिक कारणाने, कधी आरोग्याच्या कारणाने तर कधी इतर कुठल्या कारणामुळे करिअरचे मार्ग बदलत असतात. आपल्या वयाचा विचार करता पन्नाशीत प्रवेश करताना अनेकांना काय करावं, हेच कळत नाही. आपलं वय झालं असून आता आपण नव्याने काहीच सुरू करू शकत नाही, असं अनेकांना वाटत असतं. मात्र हे सत्य नाही. पन्नाशीतही अनेक पर्याय नवं करिअर सुरु करण्यासाठी आज उपलब्ध आहेत. जाणून घेऊया, कुठलं करिअर पन्नाशीत सुरु होऊ शकतं.
जर तुम्ही कुटुंब, लग्न आणि लहान मुलांबाबतच्या मानसिक आरोग्यविषयक अभ्यासक्रमाची डिग्री घेतलीत, तर याबाबतचं काउन्सिलिंग तुम्ही सुरु करू शकता. पन्नाशीत करिअर सुरु करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग असू शकतो. सरकारी संस्था, खासगी संस्था आणि वैयक्तिक पातळीवरही काउन्सिलरना मागणी असते. यातून तुम्ही चांगले पैसेही कमावू शकता.
जर तुम्हाला यापूर्वीच्या करिअरमध्ये शिक्षकी पेशाचा अनुभव असेल, तर तुम्ही ट्युशन सुरू करू शकता. पन्नाशीच्या वयात शिक्षणाचा व्यवसाय सुरु कऱणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवू शकता.
जर तुम्हाला लिहिण्याची आवड असेल आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये तुमच्यापाशी असतील, तर तुम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी फ्री लान्स लेखक म्हणून काम करू शकता. प्रवास, कुटुंब, लग्न, कायदा या आणि यासारख्या तुमच्या आवडीच्या कुठल्याही विषयावर तुम्ही लेखन सुरू करू शकता. सध्या बाजारात अनेक प्रकाशन संस्था, चॅनल्स, वेबसाईट्स आहेत. त्यांना सतत नवनव्या कंटेटची गरज असते. ही गरज पुरवण्याचं काम तुम्ही करू शकता.
जर तुमचं वाचन अफाट असेल आणि तुम्हाला तुमच्या गोष्टी सांगायला आणि लिहायला आवडत असतील, तर हे एक उत्तम करिअर होऊ शकतं. मुलांसाठी तुम्ही ‘स्टोरी टेलर’ म्हणून काम करू शकता. शाळांमध्ये किंवा रिडिंग क्लबमध्ये स्टोरी टेलर हे एक मजेशीर काम असतं. तिथल्या मुलांना मजेशीर आणि मनोरंजक पद्धतीने गोष्टी वाचून दाखवण्याचं हे काम असतं. यात चांगलं करिअर होऊ शकतं.
अधिक वाचा - Facebook ची मूळ कंपनी Meta ने 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना टाकले काढून
रिअल इस्टेट एजंटच्या व्यवसायात पन्नासपेक्षा अधिक वयाच्या 60 टक्के महिला असल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. या सर्व महिला उत्तम कमाई करत असून दिवसेंदिवस त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचं चित्र आहे. याबाबत एक ऑनलाईन कोर्स करून तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता.
पन्नाशीनंतर शेफ म्हणून काम करण्याचा निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक प्रतिष्ठित रोजगारही उपलब्ध करून देणारा ठरतो.
डिस्क्लेमर - सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही करिअरबाबतच्या टिप्स आहेत.