Car price | नवीन वर्षात कार होणार महाग, सेंकड हॅंड कारची वाढू शकते मागणी

Car manufacturers : कारच्या किंमतीतील ही वाढ तज्ज्ञांच्या मते ग्राहकांच्या मानसिकतेत बदल घडवू शकते. कारच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एन्ट्री लेव्हलच्या कार विकत घेणारे ग्राहक आपला मोर्चा सेंकड हॅंड कारकडे वळवू शकतात. यंदा नेहमीपेक्षा मोठा फटका ग्राहकांना बसण्याची चिन्हे आहेत. कारण कार उत्पादक कंपन्यांनी (Car manufacturers) यावर्षी कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे आधीच कारच्या किंमतीत वाढ केलेली आहे.

Car price rise
कारच्या किंमतीत झाली वाढ 
थोडं पण कामाचं
  • नवीन वर्षात कारच्या किंमतीत होणार वाढ
  • कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे आधीच कारच्या किंमतीत वाढ
  • ग्राहकांचा कल सेकंड हॅंड कार विकत घेण्याकडे वाढतो आहे

Automobile | नवी दिल्ली : नव्या वर्षात वाहनांची किंमत वाढवणे (Vehicle price) ही वाहन उद्योगातील नेहमी बाब आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत असलेले मूल्य, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती इत्यादी घटकांमुळे वाहनांच्या किंमतीतील वाढ (Car price rise) केली जात असते. मात्र यंदा नेहमीपेक्षा मोठा फटका ग्राहकांना बसण्याची चिन्हे आहेत. कारण कार उत्पादक कंपन्यांनी (Car manufacturers) यावर्षी कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे आधीच कारच्या किंमतीत वाढ केलेली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki)२०२१ मध्ये तीनवेळा कारच्या किंमतीत वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये मारुतीच्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. (Cars to get more expensive in 2022, demand for second hand cars may increase)

वाढलेला वेटिंग पिरियड

कारच्या किंमतीतील ही वाढ तज्ज्ञांच्या मते ग्राहकांच्या मानसिकतेत बदल घडवू शकते. कारच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एन्ट्री लेव्हलच्या कार विकत घेणारे ग्राहक आपला मोर्चा सेंकड हॅंड कारकडे वळवू शकतात. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे मागील काही महिन्यात पुरवठा साखळीवर परिणाम झालेला असला आणि त्याचा वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झालेला तरी सेंकड हॅंड कारच्या बाजारात मात्र मोठी तेजी दिसून आली आहे. त्यात कार उत्पादक कंपन्या ग्राहकांना कार ताब्यात मिळण्यासाठी वाट पाहायला लावत आहेत. सध्या अनेक कारवरील वेटिंग पिरीयड हा दोन महिन्यांच्या आसपास आहे आणि मागणी असलेल्या वाहनांसाठी वाढून तो ७ महिन्यांवरदेखील पोचू शकतो. यामुळे कार उत्पादक कंपन्यांसमोर मोठी आव्हाने आहेत.

सेकंड हॅंड कारची वाढू शकते मागणी

भारतातील सेकंड हॅंड कारची बाजारपेठ २०२० मध्ये २७ अब्ज डॉलरची होती. २०२६ मध्ये ही बाजारपेठ दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढून ५० अब्ज डॉलरवर पोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विभागलेले आणि असंघटीत आहे. यामध्ये कारदेखो, कार२४, ड्रूम, स्पाइनी आणि कारट्रेड सारखे स्टार्टअप आहेत. नव्या कारच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे ग्राहक सेकंड हॅंड कारची मागणी वाढत या स्टार्टअपला त्याचा लाभ होऊ शकतो. कारण अनेक ग्राहकांसाठी नव्या कारच्या तुलनेत सेकंड हॅंड कार हा एक चांगला आणि परवडणारा पर्याय ठरू शकतो.

वाहनांच्या किंमतीतील वाढ

टाटा मोटर्स, होंडा कार, टोयोटा, रेनॉं इत्यादी कंपन्यांनीदेखील कारच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जानेवारीपासून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहेत. मात्र याचा फटका यांच्या विक्रीला बसू शकतो. वाहनांच्या किंमतीतील वाढ ही सर्वच श्रेणींमध्ये होणार असून यात पारंपारिक आणि इलेक्ट्रिक वाहने दोघांचाही समावेश असणार आहे. स्कोडा ऑटोनेदेखील भारतात वाहनांच्या किंमतीतील वाढ जाहीर केली आहे. स्कोडाच्या वाहनांमध्ये ३ टक्के वाढ होणार असून वोक्सवॅगनच्या कारच्या किंमतीत २ ते ५ टक्के वाढ होणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून ही वाढ लागू होणार आहे.

मर्सिडिज बेन्झसारख्या आलिशान कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यादेखील त्यांच्या काही मॉडेलच्या किंमतीत २ टक्क्यांची वाढ करणार आहेत. ऑडी ही आणखी एक आलिशान कार उत्पादक कंपनी आपल्या वाहनांच्या किंमतीत ३ टक्के वाढ करणार आहे.

सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा प्रश्न यामुळे वाहनांच्या उत्पादनात झालेली घट आणि त्याचबरोबर वाहनांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे सेकंड हॅंड कारची बाजारपेठ वाढली आहे, एवढेच नव्हे तर चांगल्या दर्जाच्या सेंकड हॅंड कारच्या मागणीत वाढदेखील झाली आहे. मागील काही महिन्यात सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याच्या संकटामुळे कारच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सेकंड हॅंड कारच्या मागणीत सातत्याने वाढ होते आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी