देशातील २६ लाख करदात्यांना मिळाला ७० हजार १२० कोटींचा परतावा

भारतातील २६ लाख ९ हजार करदात्यांना ७० हजार १२० कोटी रुपयांचा परतावा अर्थात इन्कम टॅक्स रिफंड मिळाला. आयकर विभागाने ही माहिती दिली.

CBDT refunds over Rs 70,10 cr between April 1 to September 6 to over 26.09 lakh taxpayers
देशातील २६ लाख करदात्यांना मिळाला ७० हजार १२० कोटींचा परतावा 

थोडं पण कामाचं

  • देशातील २६ लाख करदात्यांना मिळाला ७० हजार १२० कोटींचा परतावा
  • ज्या नागरिकांनी अतिरिक्त कर भरल्याचे आढळले त्यांना कर परतावा दिला
  • आर्थिक वर्ष २०२१-२२च्या एक एप्रिल ते सहा सप्टेंबर या कालावधीत दिला परतावा

नवी दिल्ली: भारतातील २६ लाख ९ हजार करदात्यांना ७० हजार १२० कोटी रुपयांचा परतावा अर्थात इन्कम टॅक्स रिफंड मिळाला. आयकर विभागाने ही माहिती दिली. CBDT refunds over Rs 70,10 cr between April 1 to September 6 to over 26.09 lakh taxpayers

ज्या नागरिकांनी अतिरिक्त कर भरल्याचे आढळले त्यांना कर परतावा देण्यात आला. आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२१-२२च्या एक एप्रिल ते सहा सप्टेंबर या कालावधीत परतावा दिला. 

वैयक्तिक कर भरणाऱ्यांपैकी २४ लाख ७० हजार ६१२ जणांना १६ हजार ७५३ कोटी रुपयांचा परतावा दिला. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील १ लाख ३८ हजार ८०१ प्रकरणांमध्ये ३६ हजार ६९६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. 

आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०२०-२१ चे वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत दिली आहे. कंपन्याना त्यांचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी १५ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. 92 E अंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करणाऱ्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा रिपोर्ट सादर करण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आकलन वर्ष २०२१-२२चे रिटर्न भरण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली. आकलन वर्ष २०२१-२२च्या उत्पन्नाचा सविस्तर रिपोर्ट सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली. आकलन वर्ष २०२१-२२चा विलंबाने अथवा सुधारित स्वरुपातला उत्पन्नाचा सविस्तर रिपोर्ट सादर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी