CBSE Fake News : सध्या विविध शिक्षण मंडळांकडून परीक्षांच्या (Exam) तारखा जाहीर झाल्याच्या बातम्या येत आहेत. सीबीएसई (CBSE) ते सीआयएससीई (CISCE) या बोर्डांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याची बातमी मिळत आहे. मात्र ही बातमी केवळ अफवा असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर काही जण अशा बातम्या पसरवत असल्याचं समोर आले आहे. दरम्यान, CBSE बोर्ड 2023 च्या परीक्षेचे वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात परीक्षेच्या तारखांचा उल्लेख आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे समोर आले आहे. याबाबत सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी सुचना जारी केली आहे. (Students beware! CBSE 2023 Exam fakeTime Table Viral)
अधिक वाचा : सुब्रमण्यम स्वामींनी नरेंद्र मोदींची रावणासोबत केली तुलना
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. त्यात म्हटलंय की, परीक्षांच्या वेळापत्रकाच्या अनेक आवृत्त्या प्रसारित केल्या जात आहेत, ज्या बनावट आहेत. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत माहितीची प्रतीक्षा करावी. सध्या, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्या जाणार्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या परीक्षेच्या तारखा बनावट आहेत. असं सीबीएसईने म्हटले आहे.
अधिक वाचा : पुन्हा नरेंद्र मोदींनी वाजवला ढोल
परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर नसून त्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी वाट पाहावावी, असं सीबीएसईने सांगितले आहे. सीबीएसई बोर्ड लवकरच तारखांचे वेळापत्रक जाहीर करेल. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट cbse.gov.inला भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत संकेतस्थळावर विश्वास ठेवावा. दुसऱ्या कोणत्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
CBSE ने नुकतीच 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहेत. दुसरीकडे, 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.