NFT | नव्या वर्षात सेलिब्रिटींच्या उत्पन्नाचे मोठे साधन बनणार एनएफटी, पाहा कसे...

Digital Currency : . गुगल ट्रेंडच्या रिपोर्टनुसार २०२१मध्ये लोकांनी क्रिप्टोकरन्सीपेक्षा (cryptocurrency)जास्त एनएफटीला (NFT)सर्च केले होते. एनएफटीची लोकप्रियता एवढी आहे की सेलिब्रिटींपासून कंपन्यांपर्यत सर्वांनीच यात एन्ट्री केली आहे. हॉलीवूडमध्ये पॅरिस हिल्टन, लिंडसे लोहान असो की बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, सलमान खान असो की सुनील गावस्कर असो सर्वांनीच एनएफटीमध्ये एन्ट्री केली आहे.

Non Fungible Token
नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी  
थोडं पण कामाचं
  • जगातील पहिला एसएमएस ९१ लाख रुपयांना विकला गेला. १९९२ मध्ये पाठवला होता हा एसएमएस
  • अमिताभ बच्चन, रजनीकांत, सलमान खान, सनी लियोनी, सुनील गावस्कर यांची एनएफटीमध्ये एन्ट्री
  • एनएफटीवर चित्र, शोभेच्या वस्तू, हस्तकला, म्युझिक अल्बम, फोटो, जुने कलेक्शन यासारख्या कोणत्याही गोष्टीचे डिजिटल स्वरुपात रुपांतर होते.

Non Fungible Token | नवी दिल्ली: डिजिटल जगतात क्रिप्टोकरन्सीशी स्पर्धा करण्यासाठी एनएफटीची (Non Fungible Token)घोडदौड सुरू झाली आहे. गुगल ट्रेंडच्या रिपोर्टनुसार २०२१मध्ये लोकांनी क्रिप्टोकरन्सीपेक्षा (cryptocurrency)जास्त एनएफटीला (NFT)सर्च केले होते. एनएफटीची लोकप्रियता एवढी आहे की सेलिब्रिटींपासून कंपन्यांपर्यत सर्वांनीच यात एन्ट्री केली आहे. हॉलीवूडमध्ये पॅरिस हिल्टन, लिंडसे लोहान असो की बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, सलमान खान असो की सुनील गावस्कर असो सर्वांनीच एनएफटीमध्ये एन्ट्री केली आहे. आता यात कॉर्पोरेट जगतानेही पाऊल टाकले आहे. (Celebrities all set to earn big money from NFT)

जगातील पहिला एसएमएस विकला गेला ९१ लाखांमध्ये

अलीकडेच जगातील पहिला एसएमएस विकला गेला. हा एसएमएस १९९२ मध्ये पाठवण्यात आला होता. व्होडाफोनने तो एसएमएस एनएफटीच्या रुपात १.०७ लाख युरो म्हणजे जवळपास ९१ लाख १५ हजार रुपयांना तो लिलावात विकला. मात्र हा कोणी विकत घेतला ते मात्र समोर आलेले नाही. या डिसेंबर १९९२ला “Merry Christmas” असा मेसेज व्होडाफोन नेटवर्कद्वारे पाठवण्यात आला होता.

याच प्रकारे मार्च महिन्यात ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी आपला सर्वात पहिला ट्विट एनएफटीच्या रुपात लिलावात विकला होता. त्यांचे हे ट्विट २९ लाख डॉलरमध्ये विकले गेले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमिताभ बच्चन यांनी एनएफटीचा विक्री सुरू केली. यात त्यांनी आपले कलेक्शन विकून जवळपास ७ कोटी रुपये मिळवले.

एनएफटीमधून कशी होते कमाई

एनएफटी हे डिजिटल चलन मागील ४-५ वर्षात तेजीने वाढले आहे. एनएफटी हे एक प्रकारचे डिजिटल कलेक्शन प्लॅटफॉर्म आहे. यावर आर्ट वर्क, शोभेच्या वस्तू, चित्र, फोटो, जुने कलेक्शन, म्युझिक आणि इतर काहीही डिजिटल स्वरुपात उपलब्ध होते. ज्यांना यात रस असतो ते या वस्तू विकत घेतात. जे या वस्तू विकतात त्यांना यातून मोठी कमाई होते. एका अहवालानुसार एनफटीची विक्री १७ अब्ज डॉलरचा आकडा ओलांडू शकते.  २०२२ मध्येही याची बाजारपेठ तेजीत राहील.

एनएफटी (NFT) काय असते?

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते. ही खरी वस्तू संगीत, कला, खेळणी, गेम, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट इत्यादी विविध वस्तूंचे डिजिटल स्वरुपात प्रतिनिधित्व करणारी ही मालमत्ता किंवा टोकन असते. मात्र याच्या नावात असल्याप्रमाणे म्हणजे हे नॉन फंजिबल टोकन असल्यामुळे याची इतर वस्तूशी अदलाबदल होऊ शकत नाही. हे युनिक आणि दुसऱ्या कशानेही न बदलता येणारे असते. अलीकडच्या काळात एनएफटी हे कलेशी निगडीत वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी लोकप्रिय झाले आहेत. मात्र यांचा शोध काही आताच लागलेला नाही. २०१४ पासून एनएफटी चलनात आहेत.

एनएफटी हे डिजिटल टोकन असते म्हणजेच ही एक डिजिटल मालमत्ता असते. त्यामुळे याचा संबंध इंटरनेटशी आहे. प्रत्येक एनएफटीचे स्वत:चे असे एक खास वैशिष्ट्य असते. इथेच या डिजिटल टोकनचा नॉन फंजिबल भाग महत्त्वाचा ठरतो.

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी