Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचं गिफ्ट! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला;पण..

काम-धंदा
भरत जाधव
Updated Mar 24, 2023 | 23:13 IST

केंद्र सरकारच्या (Central government) कर्मचाऱ्यांसाठी (employees)आनंदाची बातमी हाती आली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं (Dearness Allowance) मोठं गिफ्ट दिलं आहे.  महागाई भत्त्यामध्ये 4 वाढ केली आहे, या वाढीनुसार महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे.

Center's gift to government employees! Dearness allowance increased by 4 percent;
महागाई भत्ता वाढला, पण सरकारी तिजोरीवर पडला बोजा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं (Dearness Allowance) मोठं गिफ्ट दिलं आहे.
  • डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल
  • सरकारवर 12 हजार 815 रुपयांचा बोजा पडणार आहे.

नवी दिल्लीः  केंद्र सरकारच्या (Central government) कर्मचाऱ्यांसाठी (employees)आनंदाची बातमी हाती आली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं (Dearness Allowance) मोठं गिफ्ट दिलं आहे.  महागाई भत्त्यामध्ये 4 वाढ केली आहे, या वाढीनुसार महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे.  (Center's gift to government employees! Dearness allowance increased by 4 percent; but..)

अधिक वाचा  : जोडीदाराशी मेसेजमध्ये या गोष्टी नका बोलू, नाहीतर...

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खूशखबरी दिली आहे. केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल. मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे. पूर्वलक्षी प्रभवाने ही वाढ लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.

अधिक वाचा  : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर 12 हजार 815  रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा 47 .58 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर 69.76  पेशनधारकांनाही या निर्णयामुळे लाभ होईल. डीएमध्ये झालेली ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी