Rural Women | ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा! सरकार मोफत देणार ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट, पाहा अटी

Overdraft facility for Rural Women | केंद्र सरकार (Central government)ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी (rural women)एक नवीन सेवा करणार आहे. ही सेवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (Overdraft facility)असणार आहे. हे एक प्रकारचे कर्जच असते. या सुविधेमुळे ग्राहक आपल्या बॅंक खात्यात सध्या असलेल्या बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. यामध्ये ग्राहकाला एका निश्चित कालावधीमध्ये ही रक्कम परत करायची असते आणि यावर व्याजदेखील आकारले जाते. हे व्याज डेली बेसिसवर कॅल्क्युलेट केले जाते. ओव्हरड्राफ्टची सुविधा कोणतीही बॅ

Overdraft facility for Rural Women
ग्रामीण भागातील महिलांसाठी ओव्हरड्राफ्टची सुविधा 
थोडं पण कामाचं
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी केंद्र सरकारची खास योजना
  • ग्रामीण भागातील महिलांना मिळणार ५,००० रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा
  • महिलांना कर्ज मिळणे सुलभ व्हावे यासाठी उचलले पाऊल

Overdraft facility for Rural Women | नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central government)ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी (rural women)एक नवीन सेवा करणार आहे. ही सेवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (Overdraft facility)असणार आहे. हे एक प्रकारचे कर्जच असते. या सुविधेमुळे ग्राहक आपल्या बॅंक खात्यात सध्या असलेल्या बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. यामध्ये ग्राहकाला एका निश्चित कालावधीमध्ये ही रक्कम परत करायची असते आणि यावर व्याजदेखील आकारले जाते. हे व्याज डेली बेसिसवर कॅल्क्युलेट केले जाते. ओव्हरड्राफ्टची सुविधा कोणतीही बॅंक (Bank) किंवा बिगर बॅंकिग वित्तीय कंपनी (NBFC) देऊ शकते. ग्राहकाला मिळणाऱ्या ओव्हरड्राफ्टची मर्यादा बॅंक किंवा एनबीएफसी निश्चित करतात. म्हणजेच वेगवेगळ्या बॅंक आणि एनबीएफसीसाठी ही मर्यादा वेगवेगळी असू शकते. (Central government announces Overdraft facility of Rs 5,000 for rural women)

नवीन सुविधा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा १८ डिसेंबर २०२१ला दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा सुरू करतील. 

महिलांना मिळतील ५ हजार रुपये

महिलांना ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यासंदर्भातील विषयाबाबत अर्थमंत्र्यांनी २०१९-२० मध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती. त्यानुसार दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन ग्रामीण भागातील महिला समूहांच्या सदस्यांकरता सुरू करण्यात येते आहे. महिला स्वसहायता समूहाच्या सदस्यांना ही सुविधा मिळणार आहे.

सर्व बॅंकाना भारतीय बॅंक संघाने ही सुविधा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेची इतर माहितीदेखील देण्यात आली आहे. दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन ही ग्रामीण विकास मंत्रालयाची एक प्रमुख योजना आहे. याचे उद्दिष्ट निर्धन महिलांच्या स्वसहायता समूहांना आर्थिक मदत करणे हा आहे. बॅंकांच्या कर्ज व्यवस्थेचे दरवाजे महिलांना खुले करणे हा देखील एक उद्देश आहे. राज्य ग्रामीण आजीविका मिशनने देखील याची प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामीण भागातील स्वयसहायता समूहाच्या सदस्यांनी त्या बॅंक शाखांमध्ये जाऊन या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे जिथे प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत त्यांचे बचत खाते सुरू करण्यात आले आहे. मिशनची सुरूवात जून २०११मध्ये झाली होती आणि १५ डिसेंबर २०२१ पर्यत ७३.५ लाख गटांतील ८.०४ महिलांना जोडण्यात आले आहे. २०२४ पर्यत जवळपास १० कोटी महिला जोडल्या जाण्याची अपेक्षा आहे. 

३० नोव्हेंबर २०२१ पर्यत चालू आर्थिक वर्षात २७.३८ लाख महिला गटांना ६२,८४८ कोटी रुपयांपर्यतचे कर्ज बॅंकांनी दिले आहे. एप्रिल २०१३नंतर ४.४५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वितरित केले आहे. या कर्जावरील देखरेखीसाठी एक समितीदेखील आहे. या समितीतीत विविध गटांचे प्रतिनिधी असतात. ते महिला गट आणि बॅंकांच्या मध्ये देखरेखीचे काम करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी