7th Pay Commission Update: मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत नवा आदेश

Central Government employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पदोन्नतीसंदर्भातदेखील सरकारने नियमात बदल केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत सरकारकडून नवे परिपत्रक आले आहे. नियमात नेमके काय बदल केले आहेत ते जाणून घ्या.

central employees
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
  • कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पदोन्नतीसंदर्भात मोठी बातमी
  • पदोन्नतीसाठीच्या किमान सेवेची अटीमध्ये बदल

7th Pay Commission CPC : नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाखो केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. त्याचबरोबर पदोन्नतीसंदर्भातदेखील सरकारने नियमात बदल केला आहे.  या निर्णयापूर्वीच सरकारने नवा अध्यादेश जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत सरकारकडून नवे परिपत्रक आले आहे. सरकारने पदोन्नतीसाठी किमान पात्रता सेवांचे नियम बदलले आहेत. यासंदर्भात विस्ताराने जाणून घ्या. (Central government changes rules for promotion of central employees)

अधिक वाचा : PM मोदींनी 93व्या मन की बात मधून देशवासियांशी साधलेला संवाद

केंद्रीय कर्मचारी आधीच महागाई भत्त्यातील वाढीकडे डोळे लावून बसले आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मुद्दाही महत्त्वाचा असतो. 

किमान पात्रता सेवा नियमात बदल

कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) या विषयावर एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये पदोन्नतीसाठी किमान सेवेची अट सांगितली आहे. सर्व मंत्रालये आणि विभागांनी नोकऱ्यांमधील भरती आणि सेवा नियमांमधील बदल लागू करावेत, असे म्हटले आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पे बँड आणि ग्रेड लेव्हल पे मॅट्रिक्समध्ये समाविष्ट केले जावे.

अधिक वाचा : Disha Patani Photo: दिशा पटानी म्हणतेय "Missing My...", टायगर श्रॉफसोबत ब्रेक-अपनंतर दिशाची पोस्ट चर्चेत

पदोन्नतीसाठी किती वर्षांची नोकरीची अट

नुकत्याच झालेल्या बदलांनंतर पदोन्नतीचे नियम असे असतील,

लेव्हल 1 आणि लेव्हल 2 वर बढतीसाठी, 3 वर्षांची सेवा आवश्यक असेल. स्तर 6 ते स्तर 11 पर्यंत पदोन्नतीसाठी, 12 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. त्याच वेळी, स्तर 7 आणि स्तर 8 साठी 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : विधानसभेत मळली तंबाखू, खेळले मोबाईल गेम

महागाई भत्त्यातील वाढ कधी

मात्र, केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सणासुदीला मोदी सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देऊ शकते. नवरात्र सुरू झाल्यानंतर सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते.

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांच्या डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये. तथापी, सरकारी कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी असे की केंद्राने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत DA आणि DR वाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जुलै महिन्याची वाढ अद्याप झालेली नाही. सध्या, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 34% डीए मिळत आहे. यामध्ये मार्च 2022 मध्ये 3%नी वाढ करण्यात आली होती. या आधी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 31% डीए मिळत होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून महागाई भत्त्यातील वाढीची प्रतिक्षा करत होते. महागाई भत्त्यात दणदणीत वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातदेखील चांगलीच वाढ होणार आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- औद्योगिक कामगार आकडेवारीच्या आधारावर महागाई भत्ता (DA)ठरवला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी