केंद्र सरकार करतेय कर्ज माफीचा विचार; कोणाला मिळणार कर्ज माफी? आणि कशी?

काम-धंदा
Updated Aug 19, 2019 | 15:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अर्थव्यवस्थेची गाडीच मंदावली असल्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशातील मायक्रो फायनान्स कंपन्या अडचणीत आल्या आहेत. या कंपन्यांना सावरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 central government, debt waiver to small borrowers, microfinance companies, economically backward sector, Indian economy, new beginning, Times now marathi, times now, times now marathi news, marathi, marathi news paper, marathi news, online, Samachar, Ma
छोट्या कर्जदारांना माफीचे संकेत   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आव्हानांचा डोंगर; मोदी सरकार काय करणार याकडे देशाचे लक्ष
  • छोट्या कर्जदारांना कर्ज माफी देण्याचा विचार; न्यू बिगिनिंग तरतुदीनुसार देणार कर्जमाफी
  • देशातील मायक्रो फायनान्स सेक्टरला वाचविण्याचा सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली: सध्या भारती अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आजवरची सर्वांत मोठी मंदी आहे. वाहन उद्योगाच्या अनेक शोरूम बंद पडल्या असून, हजारोंवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्थेची गाडीच मंदावली असल्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होताना दिसत आहे. ऑटोमोबाईलमधील मंदी टायर, स्टील अशा अनेक उद्योगांवर होणार आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून देशातील मायक्रो फायनान्स कंपन्या मोठ्या अडचणीत आल्या आहेत. या कंपन्यांना सावरण्याची सध्या गरज आहे. बुडीत कर्ज हा या कंपन्यांपुढील सगळ्यात मोठी समस्या असून, या क्षेत्राला टेकू देण्यासाठी आर्थिक दुर्बल वर्गातील कर्जे ‘न्यू बिगिनिंग’ तरतुदीनुसार नवी करण्याचा विचार सरकार करत आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर कंपन्या सावरतील, अशी अपेक्षा आहे. सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निकषांबाबत चर्चा सुरू

केंद्र सरकार सध्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार सध्या आर्थिक दुर्बल वर्गातील छोट्या कर्जदारांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे. यासाठीच्या योजनेवर सध्या सरकार काम करत आहे. सध्या या योजनेसाठी पात्रता निकष कोणते असावेत, यावरू संभ्रम असल्यामुळे सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांसोबत चर्चाही सुरू केली आहे. सरकारसोबत या योजनेसाठी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. त्यावरून कार्पोरेट क्षेत्राचे सचिव श्रीनिवास यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी, छोट्या कर्जदारांना कर्ज माफी देताना कोणते निकष असावेत, यावरून चर्चा सुरू आहे. ही कर्जमाफी व्यक्तिगत दिवाळे आणि आणि ऋण संशोधन अंतर्गत होणार आहे. आर्थिक दुर्बल वर्गातील सर्वांत प्रलंबित कर्जांसाठी ही योजना लागू होण्याची शक्यता आहे. या कर्जांना ‘न्यू बिगिनिंग’ तरतुदीनुसार ही माफी देण्यात येणार आहे.

काय म्हणाले श्रीनिवास?

या संदर्भात श्रीनिवास यांनी पीटीआयला माहिती दिली. ते म्हणाले, ‘जर, एखाद्या कर्जदाराने ‘न्यू बिगिनिंग’ योजनेचा लाभ यापूर्वी उठवला असले तर, त्या कर्जदाराला पुढची पाच वर्षे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारने मायक्रो फायनान्स उद्योगाच्या समाधानासाठी सर्व उपयायोजना राबवणार आहोत. ही योजना थकीत कर्जे कमी करण्यासाठीची असेल. गेल्या तीन ते चार वर्षांतील अशा कर्जदारांची रक्कम दहा हजार कोटींच्यापेक्षा अधिक नाही.’ मायक्रो फायनान्स कंपन्यांशी सध्या सरकार चर्चा करत असल्याची माहितीही श्रीनिवास यांनी दिली. ते म्हणाले, ‘आम्ही मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. त्यांच्या चिंतेच्या विषयांवर तोडगा काढला जाईल. मायक्रो फायनान्स उद्योग देशोधडिला जाणार नाही. याची काळजी घेतली जाईल. पात्रतेच्या आधारावर छोट्या कर्जदारांना माफी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या मायक्रो फायनान्स कंपन्यांसोबत मोठी चर्चा सुरू आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...