7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार 2 लाखांहून अधिक रक्कम...हाती येणार डीए थकबाकी

7th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच एक मोठी खूशखबर मिळणार आहे. केंद्र सरकार आता 18 महिन्यांच्या डीए थकबाकी (DA Arrear)वर आपला निर्णय जाहीर करू शकते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच दिवसांपासून याच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबतची आपली मागणी लावून धरली आहे. या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.

7th Pay Commission
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डीए थकबाकी 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स डीए थकबाकीच्या प्रतिक्षेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन
  • थकबाकी मिळाल्यावर कर्मचाऱ्यांच्या हाती येणार मोठी रक्कम

7th Pay Commission Update : नवी दिल्ली : महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई भत्त्याची थकबाकी हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. त्या आघाडीवर आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच एक मोठी खूशखबर मिळणार आहे. केंद्र सरकार आता 18 महिन्यांच्या डीए थकबाकी (DA Arrear)वर आपला निर्णय जाहीर करू शकते. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच दिवसांपासून याच्या प्रतिक्षेत आहेत. आता कर्मचारी संघटना आणि  पेन्शनधारकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्याकडे या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. पेन्शनर्स संघटनेने यासाठी निवेदनही पंतप्रधानांना दिले आहे. त्यामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारक पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात याकडे डोळे लावून बसले आहेत. पंतप्रधान लवकरच यावर तोडगा काढतील अशी आशा सर्वांना आहे. सरकारने थकबाकी दिल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. (Central government employees and pensioners may get DA arrear)

अधिक वाचा  : आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

डीए थकबाकी मिळाल्यावर हाती येईल इतकी रक्कम 

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबतची आपली मागणी लावून धरली आहे. या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. जर केंद्र सरकारने ही थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली तर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) डीए थकबाकीची थकबाकी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम (स्टाफ साइड) च्या शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, लेव्हल-1 कर्मचार्‍यांची महागाई थकबाकी 11,880 ते 37,554 रुपयांपर्यंत आहे. इतरही कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाची माहिती त्यांनी दिली. त्याच वेळी, जर लेव्हल-13 (7वी CPC बेसिक पे स्केल) 1,23,100 ते 2,15,900 रुपये किंवा लेव्हल-14 साठी कॅल्क्युलेशन केले जाईल तेव्हा कर्मचार्‍याच्या हातात डीएची थकबाकी 1,44,200 ते 2,18,200 रुपये इतकी रक्कम येईल.

अधिक वाचा  : दरीत अडकलेला बैल 25 दिवसांनी सुरक्षित बाहेर काढला

महागाई भत्त्याच्या थकबाकीची प्रतिक्षा

केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्याच्या प्रतिक्षेत मोठ्या कालावधीपासून आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या संकटानंतर केंद्र सरकारने 1 जुलै 2020 पासून महागाई भत्त्यात 11 टक्के एकरकमी वाढ केली होती. परंतु, त्या कालावधीतील (18 महिने) महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. महागाी भत्त्याच्या थकबाकीबाबत गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले होते की फ्रीझ महागाई भत्त्याच्या बदल्यात थकबाकी दिली जाणार नाही. त्याचवेळी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांमुळे सरकारवर सातत्याने दबाव वाढत आहे. मधल्या काळात सरकारने महागाई भत्त्यात वाढदेखील केली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोचला आहे.

पेन्शनधारकांचे म्हणणे काय?

पेन्शनधारक देखील महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या प्रतिक्षेत आहेत.  पेन्शनधारकांनी आवाहन केले आहे की अर्थ मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान रोखलेली DA/DR ची थकबाकी द्यावी. पेन्शनधारकांचा असा युक्तिवाद आहे की जेव्हा डीए/डीआर बंद करण्यात आला तेव्हा किरकोळ महागाई झपाट्याने वाढली होती आणि पेट्रोल आणि डिझेल, खाद्यतेल आणि डाळींच्या किमतीही विक्रमी उच्चांकावर होत्या. त्यामुळे त्या काळाशी निगडीत महागाईची थकबाकीदेखील मिळाली पाहिजे. सरकारने याबाबत सकारात्मक विचार करावा.

अधिक वाचा  : पुलकित सम्राटच्या प्रेयसीचं फोटोशूट पाहून सगळेचं चक्रावले

पेन्शनधारकांची चिंता 

थकबाकी मिळाल्यानंतर पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या हाती मोठी रक्कम येईल. त्यामुळे पेन्शनधारक याच्या प्रतिक्षेत आहेत. ही थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळाली तर त्यांच्या खात्यात मोठी रक्कम येईल. अशा स्थितीत पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की, पेन्शनधारकांच्या उदरनिर्वाहासाठी डीए/डीआर दिला जातो. 18 महिन्यांत खर्च आणि खर्च सातत्याने वाढले पण भत्ते वाढले नाहीत. यामुळे पेन्शनवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची थकबाकी सरकारने रोखू नये आणि याबाबत सकारात्मक विचार करावा, असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी