7th Pay Commission: निर्णय झाला! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला; पाहा तपशील

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची (Central Government employees) प्रतिक्षा अखेर संपली असून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने बहुप्रतिक्षित महागाई भत्ता (DA Hike) वाढीचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारी कर्मचारी आनंद व्यक्त करू शकतात. अनेक महिन्यांच्या विश्लेषण, अहवाल आणि अनुमानांनंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

7th Pay Commission: DA Hike for Central government employees
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात मिळणार 4 टक्क्यांची दणदणीत वाढ
  • या वाढीमुळे महागाई भत्ता (DA)आता 38 टक्क्यांवर पोचला

7th Pay Commission : नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची (Central Government employees) प्रतिक्षा अखेर संपली असून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने बहुप्रतिक्षित महागाई भत्ता (DA Hike) वाढीचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारी कर्मचारी आनंद व्यक्त करू शकतात. अनेक महिन्यांच्या विश्लेषण, अहवाल आणि अनुमानांनंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून महागाई भत्त्यातील वाढीची प्रतिक्षा करत होते. महागाई भत्त्यात दणदणीत वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातदेखील चांगलीच वाढ होणार आहे.(Central government employees got 4% DA hike)

अधिक वाचा : SSC Scam: पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या नात्याविषयी जगजाहीर झाली धक्कादायक माहिती

महागाई भत्त्यातील दणदणीत वाढ

या वाढीमुळे महागाई भत्ता (DA)आता 38 टक्क्यांवर पोचला आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार सरकारने 4 टक्के डीए वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. घोषणेची तारीख आणि इतर तपशिलांचे अधिकृत अपडेट लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक- औद्योगिक कामगार आकडेवारीच्या आधारावर महागाई भत्ता (DA)ठरवला जातो. आता ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर महागाई भत्त्यामध्ये  4% वाढ होण्याची शक्यता वाढलेली दिसते. जूनमध्ये निर्देशांक 0.2 अंकांच्या वाढीसह 129.2 वर राहिला होता.

अधिक वाचा : CCTV: १५ पुरुष घरात घुसले अन् महिलेला उचललं, अपहरणाचा थरार कॅमेऱ्यात कैद

महागाई भत्ता (DA Hike) वाढ: तो कधी येईल आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कसा बदल होईल?

नवीन महागाई भत्ता वाढीच्या आकडेवारीनुसार वाढीव वेतन पुढील महिन्यात कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात येण्याची शक्यता आहे, असे माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारचे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. नवीन महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारासह दिला जाईल आणि तो 1 जुलै 2022 पासून लागू होईल. नवरात्री 2022 च्या आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.

अधिक वाचा : Amruta Fadnavis: प्लॅस्टिक सर्जरी केलीय का मॅडम? या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी स्पष्टचं दिलं उत्तर

महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 हजारांहून अधिक वाढ होऊ शकते. वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. मार्च आणि एप्रिल 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, ज्यामुळे महागाई भत्ता (DA) 5% ने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचारी जून 2020 ते जून 2021 या कालावधीदरम्यानच्या थकित महागाई भत्त्याची मागणी करत आहेत. मात्र आता सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना एकरकमी 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हाती चांगलीच रक्कम येणार आहे. 

18 महिन्यांपासून प्रलंबित थकबाकी (DR) प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोचले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता मिळेल, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे. कोविड-19 महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत डीए वाढ थांबवली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी