7th Pay Commission Update: कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याची डीए थकबाकी, 3 हफ्त्यात 2.18 लाख मिळण्याची चिन्हे...

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांपासून रखडलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीवर (DA Arrear)चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. यासाठी कॅबिनेट सचिवांशी चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनचे प्रतिनिधी कॅबिनेट सचिवांसोबतच्या बैठकीत महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची विनंती करतील. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना यासंदर्भात लवकरच खूशखबर मिळू शकते.

7th Pay Commission
सातवा वेतन आयोग 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच डीए थकबाकी मिळण्याची चिन्हे
  • सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये होणार चर्चा
  • थकबाकीपोटी कर्मचाऱ्यांच्या हाती येऊ शकते मोठी रक्कम

DA  Arrears Latest : नवी दिल्ली : अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे. नोव्हेंबरनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Goverment Employees) आनंदाची बातमी मिळू शकते. कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांपासून रखडलेल्या महागाई भत्त्याच्या थकबाकीवर (DA Arrear)चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. यासाठी कॅबिनेट सचिवांशी चर्चेची वेळ निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स युनियनचे प्रतिनिधी कॅबिनेट सचिवांसोबतच्या बैठकीत महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची विनंती करतील. अर्थात केंद्र सरकार 18 महिन्यांचा डीए देण्यास मंजूरी देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील बऱ्याच कालावधीपासून हा मुद्दा चर्चेत आहे. (Central government employees may get Rs 2 lakh for DA arrear very soon)

अधिक वाचा : शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा

थकबाकीसंदर्भातील अपेक्षा वाढल्या 

डीए थकाबाकी कधी मिळणार आणि कशी मिळणार यावरील परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कारण केंद्र सरकारने याआधी 18 महिन्यांचा डीए नाकारला आहे. मात्र आता पुन्हा एकदा चर्चेची संधी मिळाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांची अपेक्षा वाढली आहे. पेन्शनर्स आणि कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे केंद्रातील कॅबिनेट सचिवांनी डीए थकबाकीच्या मुद्द्यावर चर्चेची तयारी दाखवली आहे. यासाठी वेळ निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मधल्या काळात सरकारने महागाई भत्त्यातील वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांचा 11 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यातही कोरोना काळात सरकारने महागाई भत्ता गोठवला होता. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांची जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची तीन थकबाकी मिळालेली नाही. या काळात केंद्र सरकारने 11 टक्के महागाई भत्ता वाढवला होता पण त्याचे पेमेंट गोठवले होते. अर्थात कोरोनाचे संकट निवळल्यावर सरकारने फ्रीज डीएवरील बंदी उठवली. त्यानंतर जुलै 2021 नंतर वाढीव महागाई भत्ता देण्यात आला. मात्र जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांच्या कालावधीची डीए थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.

अधिक वाचा : Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा  

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्यांचा हक्क आहे आणि सरकारने पैसे रोखू नयेत, असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दादही मागितली होती. कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचार करण्यास सांगितले होते. थकबाकी हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. सरकार थकबाकी गोठवू शकत नसल्याचेही कोर्टाने म्हटले होते. याशिवाय पेन्शनधारकांनीदेखील त्यांच्या डीआर थकबाकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले होते.

अधिक वाचा : Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

कर्मचाऱ्यांना थकबाकीची किती रक्कम मिळणार 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी मिळाल्यास त्यांच्या हाती चांगली रक्कम येणार आहे. एका अंदाजानुसार, लेव्हल-3 मधील कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीपोटी 11,880 ते 37,554 रुपये मिळू शकतात. तर लेव्हल-13 किंवा लेव्हल-14 साठी, कर्मचाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळू शकतात. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणीवर सरकार काय ठरवते आणि यातून काय मार्ग निघतो हे बैठकीतील चर्चेवर अवलंबून असणार आहे. कदाचित या रकमेविषयी एखादी सेटलमेंटदेखील होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी