7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ९५,००० रुपयांपर्यत वाढणार, पाहा कॅल्क्युलेशन

Hike in DA | महागाई भत्त्यात वाढ (Dearness Allowance) याआधीच सरकारने वाढ केली आहे. मात्र महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९५,००० रुपयांपर्यतची वाढ होणार आहे. १ जुलैपासून केंद्र सरकारने महागाई भत्त्यात २८ टक्के वाढ (Hike in DA) लागू केली होती. त्यानंतर सरकारने डीएमध्ये वाढ करत तो २८ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर नेला आहे. याचा कर्मचाऱ्यांचा चांगलाच लाभ होणार असून त्यांच्या वेतनातदेखील (Salary hike)घवघवीत वाढ होणार आहे.

Salary hike for central government employees
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ 
थोडं पण कामाचं
 • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार घवघवीत वाढ
 • सरकारने याआधीच डीएमध्ये जाहीर केली आहे वाढ
 • बेसिक सॅलरी आणि ग्रेडनुसार वेतनात होणार वाढ

7th Pay Commission Latest News Today | नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee) आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात वाढ (Dearness Allowance) याआधीच सरकारने वाढ केली आहे. मात्र महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९५,००० रुपयांपर्यतची वाढ होणार आहे. १ जुलैपासून केंद्र सरकारने महागाई भत्त्यात २८ टक्के वाढ (Hike in DA) लागू केली होती. त्यानंतर सरकारने डीएमध्ये वाढ करत तो २८ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर नेला आहे.  याचा कर्मचाऱ्यांचा चांगलाच लाभ होणार असून त्यांच्या वेतनातदेखील (Salary hike)घवघवीत वाढ होणार आहे. (Central Government employees salary to increase upto Rs 95,000, check the calculation)

वेतनात ग्रेडप्रमाणे होणार वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ग्रेडनुसार आणि मूळ वेतनानुसार वाढ होणार आहे. डीए आणि डीआरमध्ये झालेल्या वाढीचा फायदा ४७.१४ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६८.६२ लाख पेन्शनर्सना होणार आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणाऱ्या पगारात वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांचा पगार १८,००० रुपये ते ५६,९०० रुपयांच्या रेंजमध्ये आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन १८,००० रुपये आहे त्यांच्या वार्षिक वेतनात ३०,२४० रुपयांची वाढ होणार आहे.

किमान बेसिक वेतनाचे कॅल्क्युलेशन

 1. कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन- १८,००० रुपये
 2. नवा वाढीव महागाई भत्ता (३१ टक्के)-५५८० रुपये दरमहा
 3. आतापर्यतचा महागाई भत्ता (१७ टक्के)- ३०६० रुपये दरमहा
 4. महागाई भत्त्यात झालेली वाढ, ५५८०-३०६० = २५२० रुपये दरमहा
 5. वार्षिक वेतनातील वाढ, २५२० x १२ = ३०,२४० रुपये

कमाल बेसिक वेतनाचे कॅल्क्युलेशन

 1. कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन- ५६,९०० रुपये
 2. नवा वाढीव महागाई भत्ता (३१ टक्के)- १७,६३९ रुपये दरमहा
 3. आतापर्यतचा महागाई भत्ता (१७ टक्के), ९६७३ दरमहा
 4. महागाई भत्त्यात झालेली वाढ, १७,६३९-९६७३ = ७९६६ रुपये दरमहा
 5. वार्षिक वेतनातील वाढ, ७९६६ x १२ = ९५,५९२ रुपये

महागाई भत्त्यातील ३१ टक्के वाढीनुसार ५६,९०० रुपये बेसिक सॅलरीवर महागाई भत्त्यातील एकूण वाढ २,११,६६८ रुपये होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वार्षिक ९५,५९२ रुपयांची वाढ होणार आहे.

थकित महागाई भत्त्यावर लवकरच निर्णय

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्त्याबरोबरच इतरही मोठे लाभ दिले आहेत. मात्र १८ महिन्यांच्या थकित महागाई भत्त्याची मागणी प्रलंबित आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार कौन्सिलने सरकारसमोर मागणी ठेवली आहे की वाढीव डीए देताना १८ महिन्यांच्या थकित महागाई भत्त्यासंदर्भात देखील वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी. डिसेंबरमध्ये कॅबिनेट सेक्रेटरीबरोबर यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. १८ महिन्यांच्या थकित महागाई भत्त्याचे प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोचले आहे. आता पीएम मोदीच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये यासंदर्भात आशा निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी