7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून पुन्हा मोठी भेट, जुलै मध्ये पुन्हा होणार महागाई भत्त्यात वाढ

Central employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या वेतनात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. येत्या जुलै महिन्यात केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या(Central Government Employees) महागाई भत्त्यात (DA) वाढ करणार असल्याची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या एआयसीपीआयच्या(AICPI) निर्देशांकात घट झाल्यानंतर आता मार्चमध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.

7th Pay Commission update
महागाई भत्त्यातील वाढ 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुन्हा एकदा वाढ होणार
  • जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची शक्यता
  • याआधी जानेवारी महिन्यात सरकारने डीएमध्ये वाढ जाहीर केली होती

DA Hike update : नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या वेतनात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. येत्या जुलै महिन्यात केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात (DA) वाढ करणार असल्याची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या  एआयसीपीआयच्या(AICPI) निर्देशांकात घट झाल्यानंतर आता मार्चमध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. एआयसीपीच्या निर्देशांकाची आकडेवारी समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत. (Central government employees to get hike in DA in July 2022)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 05 May 2022: सोन्याच्या भावात 550 रुपयांची वाढ तर चांदीमध्येही तेजी, पटापट चेक करा आजचा भाव

मार्च महिन्यात महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीत वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात दिली जाणारी वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून अवलंबून असते. मार्च 2022 मध्ये एआयसीपीआयचा निर्देशांक 125.1 इतका होता. फेब्रुवारी महिन्यात मात्र यात थोडीशी घट झाली होती. या ट्रेंडनुसार मार्च मध्येही तो कमी होईल असे वाटत होते. मात्र यात वाढ होत हा निर्देशांक 1 अंकाने वाढत 126 वर पोचला आहे.

किती होणार डीएमध्ये वाढ

मार्च महिन्यात एआयसीपीआयच्या निर्देशांकात वाढ झाल्यानंतर किंवा त्याची आकडेवारी समोर आल्यानंतर जुलै 2022 मध्ये यात वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील प्रस्तावित वाढ जुलै महिन्यात असणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारी वाढ झाली नसती तर जुलै मध्ये कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ मिळाली नसती. मात्र आता या निर्देशांकात वाढ झाल्यामुळे आता जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ज्या पद्धतीचा ट्रेंड एआयसीपीआयच्या आकडेवारीत दिसतो आहे तो लक्षात घेता ही वाढ अगदी 4 टक्क्यांपर्यतदेखील जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात दमदार वाढ होणार आहे.

अधिक वाचा : Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका; इंधनाच्या दरात झालेल्या 80 पैशांच्या वाढीत No Change

किती वेळा महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ही वाढ केली जाते. यानुसार एकदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढतो. यासाठी एआयसीपीआयच्या आकडेवारीचा आधार घेतला जातो. यावर्षी याआधीच जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ देण्यात आली आहे. ही वाढ 3 टक्के इतकी आहे. सरकारकडून याची घोषणा झाली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना याची थकबाकी देखील मिळणार आहे.

अधिक वाचा : India Post Sarkari Bharti 2022: ग्रामीण डाक सेवकांच्या 38 हजार जागा रिक्त, GDS साठी करा अर्ज

काय असतो एआयसीपीआय निर्देशांक

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीवर अवलंबून असतो. ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच एआयसीपीआयची आकडेवारी ही महागाई भत्त्याचा आधार असते. हा निर्देशांक कामगार आणि रोजगार मंत्रालयाने देशाच्या विविध शहरातील बाजारांमधून गोळा केलेल्या आकडेवारीवर अवलंबून असतो. त्यामुळे यातून देशभरातील एकूणच वस्तूंच्या किंमती आणि महागाई याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ द्यायची की नाही आणि किती द्यायची हे ठरवले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी