7th Pay Commission:नवी दिल्ली : अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance)1 जुलैपासून वाढणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता थेट 38 टक्के असेल. या वाढीचा फायदा त्यांना पगारातील (Salary Hike) बंपर वाढीच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance)वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातदेखील चर्चा केली. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ते जाणून घेऊया. (Central government employees to get salary hike from 1st July as DA is hiked)
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होऊ शकते. मार्चमध्ये आलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) वरून निर्णय घेण्यात आला आहे की जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4% दराने वाढू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 साठी AICP निर्देशांकात घसरण झाली. एआयसीपी निर्देशांक जानेवारीमध्ये 125.1 वर होता, तो फेब्रुवारीमध्ये 125 वर होता, तर मार्चमध्ये तो 1 अंकाने वाढून 126 वर पोहोचला. एप्रिल-मे आणि जूनचे आकडे अजून यायचे आहेत. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर सरकार डीए 4% ने वाढवू शकते.
जर सरकारने डीए 4% ने वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 34% वरून 38% होईल. आता जास्तीत जास्त आणि किमान मूळ वेतनात किती वाढ होईल ते पाहू.
अधिक वाचा : एअरटेल, जिओ, व्हीआयचे प्लॅन महागणार