7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार तिहेरी फायदा ! हातात येणार मोठी रक्कम, जाणून घ्या मोठे अपडेट

7th Pay Commission: पुढील महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येण्याची शक्यता आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन बाजूंनी वाढ अपेक्षित आहे. सरकार 3 मोठ्या बातम्या(7th Pay Commission) देण्याची तयारी करते आहे. पहिली भेट कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) आहे, कारण त्यात पुन्हा एकदा 5 ते 6 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. दुसरी भेट महागाई भत्त्याच्या थकबाकीची (DA Arrear)आहे. या विषयाबाबत सरकारशी सुरू असलेल्या चर्चेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

7th Pay Commission: Central government employees to get triple benefit
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार तिहेरी फायदा 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त फायदा
  • महागाई भत्त्यातील वाढीबरोबर होणार इतर फायदे
  • पीएफचे व्याजदेखील लवकरच जमा होणार

7th Pay Commission : नवी दिल्ली : पुढील महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येण्याची शक्यता आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन बाजूंनी वाढ अपेक्षित आहे. सरकार 3 मोठ्या बातम्या(7th Pay Commission) देण्याची तयारी करते आहे. पहिली भेट कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) आहे, कारण त्यात पुन्हा एकदा 5 ते 6 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. दुसरी भेट महागाई भत्त्याच्या थकबाकीची (DA Arrear)आहे. या विषयाबाबत सरकारशी सुरू असलेल्या चर्चेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, तिसरी भेट भविष्य निर्वाह निधीशी संबंधित आहे, ज्या अंतर्गत या महिन्यात पीएफ खात्यात व्याजाचे (PF interest amount)पैसे   कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होऊ शकतात. (Central government employees to get triple bonanza, check the latest update)

अधिक वाचा : EPFO Update: या तारखेला तुमच्या PF खात्यात येणार व्याजाचे पैसे, असा तपासा पीएफ बॅलन्स...

महागाई भत्ता वाढणार

वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. AICPI निर्देशांकाने मार्च, एप्रिल आणि मे 2022 मध्ये उडी घेतली आहे, त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 ते 6 टक्क्यांनी वाढवू शकते. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 किंवा 40 टक्के होईल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.

वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. मार्च आणि एप्रिल 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, ज्यामुळे महागाई भत्ता (DA) 5% ने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. पण आता मे महिन्याचे आकडे आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ६% वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी जून 2020 ते जून 2021 या कालावधीदरम्यानच्या थकित महागाई भत्त्याची मागणी करत आहेत. मात्र आता सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना एकरकमी 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हाती चांगलीच रक्कम येणार आहे. 

अधिक वाचा : SBI Update : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे ! बँकेत खाते असल्यास, लगेच बनवा हे कार्ड...नाहीतर जमा होणार नाहीत पैसे

डीए थकबाकीवर होणार निर्णय

विशेष म्हणजे, 18 महिन्यांपासून प्रलंबित थकबाकी (DR) प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोचले आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता मिळेल, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण आशा आहे. कोविड-19 महामारीमुळे अर्थ मंत्रालयाने मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत डीए वाढ थांबवली होती.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 05 July 2022: सोन्यातील तेजी कायम, चांदीच्या भावातही चांगली वाढ, लगेच पाहा ताजा भाव

पीएफ व्याजाचे पैसेही मिळतील

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 7 कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात व्याजाची चांगली बातमी मिळू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्याजाचे पैसे लवकरच पीएफ खातेदारांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात, कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पीएफची गणना केली गेली आहे. यावेळी 8.1% नुसार पीएफचे व्याज खात्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी