7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगाराव्यतिरिक्त मिळणार 30,000 रुपये, जाणून घ्या कसे?

Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees)अनेक फायदे मिळतात. त्यांच्या पगारात दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ (Allowances)केली जाते. याशिवाय प्रमोशनचे फायदे आणि इतर भत्तेही उपलब्ध आहेत. परंतु, नोकरी करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याने उच्च पदवी मिळवली, तर त्याला वेगळा लाभ दिला जातो. केंद्र सरकारने उच्च पदव्या प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत 5 पट वाढ केली आहे.

7th Pay Commission update
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त मिळणार जबरदस्त लाभ 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त अनेक लाभ मिळतात
  • पगारात दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ मिळते
  • नोकरी करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याने उच्च पदवी मिळवली, तर त्याला वेगळा लाभ मिळतो

7th Pay Commission:नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees)अनेक फायदे मिळतात. त्यांच्या पगारात दरवर्षी महागाई भत्त्यात वाढ (Allowances)केली जाते. याशिवाय प्रमोशनचे फायदे आणि इतर भत्तेही उपलब्ध आहेत. परंतु, नोकरी करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याने उच्च पदवी मिळवली, तर त्याला वेगळा लाभ दिला जातो. केंद्र सरकारने उच्च पदव्या प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत 5 पट वाढ केली आहे. पीएच.डी.सारख्या उच्च पदव्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून वाढ दिली जाते. ती 10,000 रुपयांवरून 30,000 रुपये करण्यात आली आहे. (Central Government employees will get additional benefit of Rs 30,000, check details)

अधिक वाचा : RBI On Currency Notes: नोटांवर राहणार महात्मा गांधींचा फोटो, फोटो बदलणार नसल्याचे आरबीआयने दिले स्पष्टीकरण

नवीन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन रक्कम 5 पट वाढली

कामगार मंत्रालयाने 20 वर्षे जुन्या नियमांमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना उच्च पदव्या घेण्यासाठी प्रोत्साहन रक्कम वाढवली आहे. जुन्या नियमांनुसार, नोकरीत असताना उच्च पदवी प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांना 2,000 ते 10,000 रुपयांपर्यंतचे एकरकमी प्रोत्साहन दिले जात होते. परंतु, 2019 पासून ही प्रोत्साहन रक्कम किमान 2,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली.

अधिक वाचा : HDFC Bank : एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात केली वाढ, कर्ज झाले महाग, पाहा तपशील

कोणत्या पदवीचा किती फायदा?

कामगार मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, 3 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची पदवी डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 10 हजार रुपये दिले जातील. त्याच वेळी, 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीची पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी 15,000 रुपये दिले जातील.

30,000 रुपये कोणाला मिळणार?

1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा प्राप्त केल्यावर 20,000 दिले जातील. त्याच वेळी, 1 वर्षापेक्षा जास्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा घेतलेल्या कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये मिळतील. ज्यांनी पीएचडी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता संपादन केली आहे त्यांना 30,000 रुपये दिले जातील.

अधिक वाचा : IRCTC Booking Rule : आता रेल्वे तिकिट बुकिंगचे नो टेन्शन! तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये झाला हा मोठा बदल...

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

कामगार मंत्रालयाच्या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की शुद्ध शैक्षणिक शिक्षण किंवा साहित्यिक विषयांमध्ये उच्च पात्रता प्राप्त करण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन दिले जाणार नाही. कर्मचार्‍याने मिळवलेली पदवी/डिप्लोमा कर्मचार्‍याच्‍या पदाशी किंवा त्‍याच्‍या पुढील पदावर करण्‍याच्‍या कामाशी संबंधित असावा. योग्यता आणि काम यांचा थेट संबंध असावा असे त्यात नमूद केले आहे. हे बदल 2019 पासून लागू होणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलैपासून वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील वाढ मिळणार आहे. आगामी जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA)4 टक्के वाढ लागू होणार आहे. याआधी मात्र जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होणार नसल्याची चिन्हे होती. मात्र आता एआयसीपीआयच्या (AICPI)आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांना डीएमध्ये 4 टक्के वाढ मिळणार आहे. एप्रिल महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे की महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी