Pension Hike | पेन्शनमध्ये होणार ३,००० ते ९,००० हजारांची वाढ, सरकारने डीआरमध्ये केली वाढ

Pension Hike | पेन्शनमधील ही वाढ डिअरनेस रिलीफमध्ये (Dearness Relief) वाढ झाल्यामुळे झाली आहे. सरकारने बॅंकांनादेखील सूचना दिल्या आहेत की पेन्शनमध्ये झालेल्या वाढीसंदर्भातील सूचनांचे पालन करावे आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. डिअरनेस रिलिफमध्ये झालेल्या वाढीमुळे स्वातंत्र्य सेनानींना (Freedom fighters) पेन्शनमधील वाढ मिळते आहे आणि ते १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. या वाढीमुळे स्वातंत्र्य सेनानींचे पेन्शन ३,००० रुपयांपासून ते ९,००० रुपयांपर्यत वाढणार आहे.

Central government hikes pension
केंद्र सरकारकडून स्वातंत्र्य सेनानींच्या पेन्शनमध्ये वाढ 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारकडून स्वातंत्र्य सेनानींच्या पेन्शनमध्ये वाढ
  • डिअरनेस रिलीफमध्ये ३ टक्के वाढ झाल्यामुळे होणार पेन्शनमध्ये वाढ
  • डिअरनेस रिलिफ १ जुलै २०२१ पासून सध्याच्या २६ टक्क्यांवरून वाढून २९ टक्के केला जाणार

Dearness Relief Hike | नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central government) आता स्वातंत्र्य सेनानींच्या पेन्शनमध्ये (Pension)वाढ केली आहे. पेन्शनमधील ही वाढ डिअरनेस रिलीफमध्ये (Dearness Relief) वाढ झाल्यामुळे झाली आहे. सरकारने बॅंकांनादेखील सूचना दिल्या आहेत की पेन्शनमध्ये झालेल्या वाढीसंदर्भातील सूचनांचे पालन करावे आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी.  डिअरनेस रिलिफमध्ये झालेल्या वाढीमुळे स्वातंत्र्य सेनानींना (Freedom fighters) पेन्शनमधील वाढ मिळते आहे आणि ते १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. या वाढीमुळे स्वातंत्र्य सेनानींचे पेन्शन ३,००० रुपयांपासून ते ९,००० रुपयांपर्यत वाढणार आहे. शिवाय त्यांना जुलै पासून ५ महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. (Pension Hike : Central government hikes pension by Rs 3,000 to Rs 9,000)

३ टक्क्यांची वाढ

केंद्र सरकारमधील संचालक एनआर सेकर राजू यांनी गृह मंत्रालयाच्या २८ जुलै २०२१च्या पत्राचा उल्लेख करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये स्वांतत्र्य सेनानी पेन्शनधारकांना १ जुलै २०२१ पासून २९ टक्के डिअरनेस रिलिफ देण्यासंदर्भातील आदेश आहे. स्वातंत्र्य सेनानी, पती, पत्नी या पेन्शनधारकांना डिअरनेस रिलिफ १ जुलै २०२१ पासून सध्याच्या २६ टक्क्यांवरून वाढून २९ टक्के केला जाणार आहे. डीआरमधील ३ टक्के वाढीमुळे २९ टक्के डीआर पेन्शनधारकांना मिळणार आहे. यामुळे त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.

आता इतके पेन्शन मिळेल

Ex-Andaman Political prisoners/spouses चे पेन्शन ३०,००० रुपये दरमहावरून वाढून ३८,७०० रुपये करण्यात आली आहे.
जे स्वातंत्र्य सेनानी भारताबाहेर पीडित होते त्यांचे पेन्शन २८,००० रुपयांवरून वाढून ३६,१२० रुपयांवर पोचणार आहे.
आयएनएच्या स्वातंत्र्य सेनानींचे पेन्शन २६,००० रुपयांवरून वाढून ३३,५४० रुपये प्रति महिना होणार आहे.
Dependent parents/ eligible daughters ला १५,००० रुपये मिळणारे पेन्शन वाढून आता १९,३५० रुपये होणार आहे.

६ ऑगस्ट २०१४च्या सूचनांनुसार केंद्रीय सम्मान पेन्शनला टीडीएस लागू होत नाही.

केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोग (7th Pay Commission) लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनवाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनमध्ये (pension)केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव डीआर म्हणजे महागाई दिलासा भत्त्याचा लाभ मिळणार आहे. इतकेच नाही तर या कर्मचाऱ्यांना चार महिन्यांची थकबाकी (Arrears)देखील मिळणार आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलास भत्ता (DR) यामध्ये १ जुलैपासून वाढ होत तो ३१ टक्के करण्यात आला आहे. 

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरची महागाई भत्ता आणि महागाई दिलासा भत्त्याची थकबाकीदेखील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. सरकारने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नसली तर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष करून डीआरचे कॅल्क्युलेशन मूळ वेतनानुसार केले जाते. त्यामुळे जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे पेन्शन २०,००० रुपये असेल त्यामध्ये ६०० रुपयांची वाढ होईल. ही वाढ ३ टक्क्यांनी वाढलेल्या डीआरच्या आधारावर असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी