House Building Allowance update : नवी दिल्ली : तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का? असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर घर बांधण्याच्या तयारीत असाल तर तुमच्या खिशाचा भार सरकारने हलका केला आहे. केंद्र सरकारने हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स म्हणजे एचबीएसाठीचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारचे कर्मचारी (Central govt employees) मार्च 2023 पर्यंत 7.1 टक्क्यांच्या स्वस्त व्याजदराने हाउस बिल्डिंग अॅडव्हान्सचा (House Building Allowance)किंवा म्हणजे गृहनिर्माण भत्त्याचा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकारने गृहनिर्माण कर्जावरील व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के केला आहे. (Central Government reduces interest rate for HBA for central employees)
1 एप्रिल 2022 रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हाउस बिल्डिंग अॅडव्हान्सचा (House Building Allowance)म्हणजे गृहनिर्माण भत्त्याचा आगाऊ व्याज दर 7.1 टक्के असेल. याआधी मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक 7.90 टक्के दराने घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम मिळत होती. म्हणजे जर कर्मचाऱ्यांना आता घर बांधायचे असेल तर त्यांना तुलनेने कमी खर्च येणार आहे.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) वर दिलासा जाहीर केला आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयीन मेमोरँडममध्ये म्हटले आहे की, "या मंत्रालयाच्या ओएम.. घर बांधणी आगाऊ नियम (एचबीए) - 2017 च्या 09.11.2017 च्या आंशिक दुरुस्तीमध्ये, घरावरील व्याज दर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत सुरू होणाऱ्या 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना बिल्डिंग अॅडव्हान्स 7.10 टक्के दराने असेल. 31 मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स 7.9 टक्के साध्या व्याजदराने उपलब्ध होता. त्यामुळे मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या हाउस बिल्डिंग अॅडव्हान्सवरील व्याजदरात घट झाल्याने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये व्याजदरात 80 bps ची घसरण झाली आहे.
अधिक वाचा : PPF investment limit : पीपीएफमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा केंद्राचा विचार
मित्रांनो सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम देते. यामध्ये कर्मचारी स्वत:च्या किंवा पत्नीच्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊ शकतो. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत, 31 मार्च 2022 पर्यंत, केंद्र सरकार आपल्या कर्मचार्यांना 7.9% व्याज दराने घर बांधण्यासाठी आगाऊ रक्कम देत होती. त्यात आता कर्मचाऱ्यांना दिलासा देत व्याजदर कमी करत 7.1 टक्के करण्यात आला आहे.