Modi Govt Diwali Gift : मोदी सरकारचे गिफ्ट,  १२ टक्के बंपर DA वाढीसह दिवाळी साजरी करणार सरकारी कर्मचारी 

Modi Govt Diwali Gift to Govt. Employee :    केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली आहे. सरकारने त्यांना दिवाळीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) बंपर वाढ भेट दिली आहे.

central government servant- salary biggest- hike from 1 july 2021 12 percent dearness allowance hike for central autonomous employees
 १२ टक्के बंपर DA वाढीसह दिवाळी साजरी करणार सरकारी कर्मचारी  
थोडं पण कामाचं
  •  केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली आहे. सरकारने त्यांना दिवाळीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) बंपर वाढ भेट दिली आहे.
  • डीएमध्ये थेट १२ टक्के वाढ करण्यात आली आहे
  • ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांची थकबाकी मिळाली आहे.

12 percent dearness allowance hike । नवी दिल्ली :  केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ झाली आहे. सरकारने त्यांना दिवाळीत महागाई भत्त्यात (Dearness Allowance) बंपर वाढ भेट दिली आहे. त्यांच्या डीएमध्ये थेट १२ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांची थकबाकी मिळाली आहे. (central government servant- salary biggest- hike from 1 july 2021 12 percent dearness allowance hike for central autonomous employees)

अर्थ मंत्रालयाच्या संचालक निर्मला देव यांच्या म्हणण्यानुसार, महागाई भत्त्यात ही वाढ 5व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांची (5th Central Pay Commission )
केली आहे. आता त्यांचा महागाई भत्ता 356 वरून 368 टक्क्यांवर गेला आहे. यासोबतच 6व्या वेतन आयोगाच्या केंद्रीय आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता त्यांना 189 ऐवजी 196 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला होता. डीए आणि डीआरच्या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर 34,401 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. या निर्णयामुळे 48.34 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65.26 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला आहे.

ऑल इंडिया ऑडिट अँड अकाउंट्स कमिटीचे सहाय्यक सरचिटणीस हरिशंकर तिवारी यांनी एका वेबसाइटला सांगितले की, 7 व्या वेतन आयोगात (7th Pay Commission) फिटमेंट फॅक्टरनुसार( Fitment Factor) मूळ वेतन वाढवण्यात आले आहे. कोविड 19 महामारी पाहता सरकारने डीए आणि डीआरचे 3 अतिरिक्त हप्ते थांबवले होते. हे हप्ते 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून देय होते. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि पेन्शनधारकांसाठी डीआर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या अंतर्गत, मूळ वेतन/पेन्शनमध्ये विद्यमान 17 टक्के दरापेक्षा 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी भरली जाणार नाही, असेही सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी