ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

काम-धंदा
Updated Oct 04, 2018 | 17:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICICI bank: ICICI बँकचे एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर COO चं काम बघणारे संदीप बक्षी यांच्या ५ वर्षांसाठी पदभार देण्यात आला आहे. 

chanda kochhar
चंदा कोचर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : ICICI बँकेचे सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर आताही सुट्टीवर आहेत. त्यांच्याविरोधात व्हिडिओकॉनला दिलेल्या लोनबाबतीत चौकशी सुरू आहे. संदीप बक्षी हे ICICI बँकेचे MD आणि CEO असतील. त्यांना ५ वर्षांसाठी या पदाचा कारभार सोपवला आहे. चंदा कोचर यांनी दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चंदा कोचर यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीवर त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही. 

चंदा कोचर यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त येताच ICICI बँकेचे शेअर्स वधारले आहे. बँकेचे शेअर ३ टक्क्यांनी वधारून ३१३ रूपयांवर पोहोचले. ICICI  सिक्योरिटीचा शेअर देखील १.७५ टक्क्यांनी वाढला आहे. बँकेच्या बोर्डने चंदा कोचर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. ICICI बँकेने म्हटले की,  चंदा कोचर यांना बँकेच्या सगळ्या सहयोगी कंपन्यांच्या जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात आले आहे. 

संदीप बक्षी ३ ऑक्टोबरपासून बँकेचे MD आणि CEO झाले आहेत.  चंदा कोचर यांच्यावर व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्जात नियमांना बगल दिल्याचा, नियम शिथील केल्याचा आरोप आहे. ICICI बँकेचे आणखी एक इंडिपेंडेंट डायरेक्टर एमडी माल्ल्या यांचा राजीनामा देखील बँकेने स्विकारला आहे. 

बँकेच्या बोर्डने म्हटले की, त्यांच्या रिटायरमेंटच्या फायद्यांवर सध्या सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. याआधी कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. चंदा कोचरचे पती दीपक कोचरची कंपनी नूपॉवर रिन्यूएबलमध्ये व्हिडिओकॉनने गुंतवणूक केली होती की नाही याची चौकशी सध्या cbi करत आहे. या कंपनीला ICICI बँकने लोन दिलं होतं. १९८४ साली मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून चंदा कोचर ICICI बँकेत रूजू झाल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी